पान:उषःकाल.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ओंजळ


भूल प्रीतीच्या फुलांची
चिखे प्रवादी वाघुळ
उभ्या रातीच्या उरात
जागे चंदेरी आभाळ

  कैफ तुझ्या स्वामित्वाचा
  जनी संशय कल्लोळ
  चाले बाह्यांगीच निंदा
  मनी आनंद कल्लोळ

एका मामुली मातेचे
भरे उरी स्वप्नचळ
पुन्या फाटक्या आभाळी
वीज दाभणाचा खेळ

  लोभ मातीच्या चुलीचा
  मन त्याहून सोवळं
  तीन दगडांचे पायी
  लागे त्रिखंडाची झळ

माझ्या पोळल्या हातात
नको फुलांची ओंजळ
आस फुंकरीची लागे

राहु द्या हो गंगाजल !

उपःकाल