पान:उषःकाल.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पोहे


आठवाच्या या शेल्यात
दिल्या घेतल्याची फुले

काही दिली मी कोणास
बांधण्यास स्वप्नझुले

काही राहिली अभागी
खंत काळजात उले

कोणी 'घेता' ना समर्थ
हीच व्यथा मनी सले

चकव्यात व्यर्थ गेले
कशी दिशाभूल झाले

माझ्या मातीच्या भेटीला

पोहे सुदामाचे झाले !

उषःकाल । १२