पान:उषःकाल.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फिर्याद


दोष काट्यांचा कुठें हा ?
काटे फुलातून आले !

हास्य शत्रूचे कुठले ?
हासू मित्रत्वाचे झाले !

दास्य प्रीतीचे नव्हे हे
भाग्य शापितांचे झुले !

जीवलग कोठे गेले ?
सारे जीवालाच भ्याले !

स्वप्नमहाल कोणते ?
अहो, कब्रस्थान आले !

घाव छातीवर कसे ?

भाले पाठीतून आले !

उषःकाल । ११