पान:उषःकाल.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भान


अलवार मर्म माझे
तुझ्या करात मी दिले
घुसे खंजीर पाठीत
मेल्याआधी प्रेत झाले

  अनाघ्रात स्वप्न माझे
  तुला जपण्यास दिले
  कुस्करुन कळीलाच
  चव्हाट्यात छिन्न केले

तुझ्या संगतीचे विष
माझ्या मस्तकात गेले
छिन्न नजरेचे भिंग

भान हस्तकांनी दिले

उषःकाल । १०