पान:उषःकाल.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवलाई


हृदयी कोंडुनी क्षितिजालाही
  सूर्य पाहिला नाही
अनेक गेल्या काळ्या रात्री
  नभी चंद्र उगवला नाही
काळोखाच्या महावस्त्रावर
  नक्षत्रांची जाळी
खुणावते ही तिन्ही त्रिकाळी
  कधी वेळी-अवेळी
जे असावे ते नसे परन्तु
  असते काही काही
पाऊल अडते अलगद पडते

  ही नशीबाची नवलाई !

उषःकाल । ९