पान:उषःकाल.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाखरा


उंच नभीच्या मुक्या पाखरा
नको दाखवू उगाच नखरा
ये साधुनी या एकांती

तुझे नि माझे अबोल हितगुज
वाजे हृदयी अमूर्त अलगुज
लाभेल जीवाला शांती

तुझ्या नि माझ्या सुसंवादी
साक्ष कुणाची, नकोच चिंतन
निःशद्ध तोष प्रेमांती

वस्त्रांन्त्राची खंत तुला ना
निवाऱ्याची व्यर्थ वल्गना

लाभो साथ तुझी साद्यंती

उब. काल । ८