पान:उषःकाल.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वप्नसती


फुला-फुलांचा विणला प्रियकर
मीपण झाले फुला-फुलांचे
विणून झाले कितीक शेले
स्वप्न फुलांचे मऊ गालीचे

  स्वप्नफुलांच्या स्वर्गामध्ये
  खेळ खेळलो फुलाफुलांचे
  भावजगी त्या श्रवणी आले
  किलबिलणे ते फुला-मुलांचे

आणि अचानक तुटे मालिका
स्वप्न उरीचे फुला-फुलांचे
जाणीव होता वास्तविकाची
गहन प्रश्न ते वात्सल्याचे

  स्वप्नसती मी, सौंधावरती
  दर्शन होते स्वप्नसख्याचे
  स्मित तयाचे सांगून जाते

  हे संजिवन जीव स्वप्नाचे

उष:काल । ७