पान:उषःकाल.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाझर

असे एकदा नटले अंबर
  नक्षत्रांनी लाख
विझून गेली आज कौमुदी
  नजरही झाली खाक
तू असताना दुःख वाटले
  परागाचे काटे
अनाथ झाले सौख्य आजचे
  काटेरी पाते
पोरक्या अश्रूत दिसतो
  कारुण्य सागर
सागरात आज आठवे
  मायेचा पाझर
भल्या संगतीत भासे
  स्वर्ग धरित्रीचा
अपरोक्षी लागे थांग
  भल्या करणीचा
उल्हासले मन तेव्हा
  चंद्रसूर्य हाती
मोल आस्तित्वाचे कळे
  माया आणिकांची
दगडांची रास भासे

  रत्नमाणिकांची

उषःकाल