पान:उषःकाल.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिमगिरी पुकारतो


उठा ! उठा !! उठा झणी ! उठा झणी !!
पुकार ये क्षणोक्षणी, शिंग फुंकिले रणी ॥

दुर्योधन मातला, प्रमत्त अंक फोडण्या उठा चला
दुःशासन दर्पला, आसुर शोभला खरा उठा चला ॥

प्रमत्त, रक्तभुक्त हे शिरकान होऊ द्या चला
षड्रीपुस शापिण्या, शस्त्र घ्या उठा चला॥

सप्तगिरी, विध्य तो, सह्य असह्य जाहला
रावणास विधण्या, शिवधनुष्य घ्या चला॥

स्फुल्लिंग आतला भला तेजाळून फाकला
कंसराज मर्दण्या स्वार व्हा, उठा चला ॥

अमृतास आणण्या गरुडझेप घ्या चला
परजून शस्त्र जिव्हार हे हिमगिरी पुकारतो ॥

उषःकाल । ५