पान:उषःकाल.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिरंजीव

भिंत आकाशी पाहुनी चांगदेव दंग
घाट भिवरेचा उभा वाजवी मृदंग
  कोंडी ज्ञानेश स्वतःला होता मानभंग
  कैवल्याचे द्वार उघडी ताटीचे अभंग
विसरुनी लोकाचार नामा झाला नामी दंग
मागे झोळीत जोगवा मुखी मुक्ताचे अभंग
  इंद्रायणी पोटी गेले तुक्याचे अभंग
  चिरंजीव होऊनी येता झाले बुडवे दुभंग
नसती ढंग माहित त्यांना, नव्हतेच रंग
हृदयाच्या विटेवरी उभा पांडुरंग

उबःकाल । ४