पान:उर्जा व पर्यावरण.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रॉकर बॉक्स कव्हर उघडा. (३) फ्लायव्हील अर्ध्या टप्प्यांत फिरवून Ind out व्हॉल्व्ह कसे उघडते ते पहा. पुश रॉड कसे केव्हा हलतात ते पहा. नॉझेल सिलिंडरवरून काढा. (५) प्लायव्हील फिरवल्यावर इंधन फवारा केव्हा व कसा येतो ते बघा. (६) सिलिंडर हेड काढा. (७) वर खाली होणारी पिस्टनची व पुश रॉडची हालचाल बघा. इंजिनचे भाग व कार्य: (१) सिलिंडर + पिस्टन - ज्वलन बंदिस्त करणे/ दाब तयार करणे. (२) व्हॉल्व्ह - गॅस घेणे - जाणे नियंत्रण. (३) पंप नॉझल - इंधन फवारणे. फ्लायव्हील - गतीज ऊर्जा साठवणे. (५) स्टार्टर लिव्हर-सुरुवातीस काँप्रेशन तयार होऊ न देणे, (६) इनलेट व्हॉल्व्ह - हवा आत खेचणे. (७) आऊटलेट व्हॉल्व्ह - जळालेले वायू बाहेर टाकणे. (८) रॉकर आर्ममार्फत गाईड व्हॉल्व्हमधील इनलेट व आऊटलेट उघडझाप करणे. (९) पुश रॉड संरक्षण नळी - पुश रॉडचे संरक्षण करणे, (१०) कॅम रॉड / पुश रॉड - रॉकरची वेळच्यावेळी उघडझाप करणे. (११) टॅपेट-पुश रॉडला वेळच्या वेळी गती देणे. (१२) सिलिंडर हेड-सिलिंडरमध्ये तयार झालेला दाब सहन करणे, (१३) तांब्याची गॅसकेट-वायूचे लिकेज थांबवणे, तसेच सिलिंडर हेड आणि सिलिंडरमधील गॅप भरून काढणे. (१४) पिस्टन रिंग (अ) काँप्रेशन रिंग - सिलिंडर आणि पिस्टन यांतील गॅप भरून काढण्याचे कार्य करते. (ब) ऑईल रिंग - सिलिंडर व पिस्टन यांत घर्षण होताना घर्षण कमी करणे, ऑईलचा पुरवठा करणे. (१५) कनेक्टिंग रॉड-पिस्टन व कशाफ्ट जोडणे. कँकशाफ्टच्या चक्रीय गतीचे रूपांतर सरळ गतीत करणे. (१६) फॅकशाफ्ट - पिस्टनची सरळ गती कनेक्टिंग रॉडमधून येऊन फेंकशाफ्टवर चक्रीय होत. (१७) गिअर -फ़ैकशाफ्टला गती देण्यासाठी / घेण्यासाठी टायमिंग साधने (१८) गिअर बॉक्स - गिअरला संरक्षण देण्यासाठी, डिझेल इंजिनात डिझेलचे ज्वलन होऊन त्यातून ऊर्जा मुक्त होते व ती पिस्टनला गती देण्यास वापरली जाते. इंजिनचे प्रकार ज्वलनाच्या ठिकाणाप्रमाणे - (१) बाहेर ज्वलन - सिलिंडर पिस्टनच्या बाहेर इंधनाचे ज्वलन करणे आणि मग ती ऊर्जा वापरणे. उदा. कोळशावर चालणारी आगगाडी, वाफेचे इंजिन इ. (२) अंतर्गत ज्वलन - पिस्टन व सिलिंडरमध्ये ज्वलन होणे व ऊर्जा उपयोगी पडणे. इंजिनाचे प्रकार स्टोक प्रमाणे – इंजिन दोन किंवा चार स्ट्रोकचे असते. स्ट्रोक म्हणजे काय ? पिस्टनचे एका दिशेत झालेले विस्थापन. इंजिनचे प्रकार इंधनाप्रमाणे - (१) डिझेल (२) पेट्रोल उदा. डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन,