पान:उर्जा व पर्यावरण.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस : सातवा प्रात्यक्षिक : डिझेल इंजिनचा अभ्यास करणे व कार्यक्षमता मोजणे. प्रस्तावना : याचा शोध लागला तेव्हा त्याचा वापर प्रथम रेल्वे इंजिनसाठी होऊ लागला. कालांतराने या इंजिनचा वापर शेतकऱ्याला शेतीस पाणी देण्यासाठी होऊ लागला. तसेच त्याच्या दुरुस्तीचाही विचार होऊ लागला. डिझेल इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक ऊर्जेतून ज्वलनमार्गे यांत्रिक ऊर्जा उपलब्ध करणारे यंत्र. यात प्रथम ज्वलन झाल्यावर उष्णता निर्माण होते. उष्णतेमुळे दाब तयार होतो व दाबामुळे गती मिळते. या डिझेल इंजिनचा शोध अल्फ्रेड डिझेल या शास्त्रज्ञाने लावला म्हणून त्यास डिझेल इंजिन असे म्हणतात. इंजिनचे प्रकार (I.C.Engine) अंतर्गत ज्वलन इंजिन ज्वलन'बाहेर होते. Compression Ignition (E.I. Engine) Spark Ignition (S.I.Engine) दाबावर पेटणारे (डिझेल इंजिन) विजेच्या ठिणगीने पेटणारे. उदा. पेट्रोल इंजिन 2Stroke Engine 4 Stroke Engine वरीलप्रमाणे इंजिनचे प्रकार पडतात.तर आज डिझेल इंजिनचा अभ्यास व त्याची कार्यक्षमता याचा अभ्यास कल्या. पूर्व तयारी: (१) डिझेल इंजिन खोलण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जमा करा. उदा. स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, विविध स्पॅनर सेट इ. (३) डिझेल इंजिन विषयीची सी.डी. दाखवण्याची व्यवस्था करून ठेवा. (४) शाळेत डिझेल इंजिन नसेल तर शाळेजवळील एका शेतकऱ्याची परवानगी घेऊन ठेवा. उपक्रमांची निवड (१) शाळेतील डिझेल इंजिनचा अभ्यास करून त्याची कार्यक्षमता मोजा. (२) एका शेतकऱ्याच्या शेजावर जावून त्याच्या डिझेल इंजिनचा अभ्यास करून प्रत्यक्ष कार्यक्षमता मोजा. (३) टू स्ट्रोक व फोर स्ट्रोक इंजिन मधील कार्यक्षमतेचा अभ्यास करा. अपेक्षित कौशल्ये: (१) डिझेल इंजिन खोलता व जोडता येणे. (२) डिझेल इंजिनच्या भागांचे कार्य समजणे. (३) डिझेल इंजिनची प्रत्यक्ष कार्यक्षमता मोजता येणे. (४)२ स्ट्रोक व ४ स्टोक इंजिन ओळखता येणे डिझेल इंजिन उद्देश : डिझेल इंजिन उघडून पाहणे व त्यातील भागांची ओळख करून घेणे. साहित्य : स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, विविध स्पॅनर सेट इ. कृती : इंजिन कसे उघडावे? (१) इंजिन खोलण्यास सुरुवात करण्याअगोदर डिझेल टाकीतील सर्व डिझेल काढावे. ५४