पान:उर्जा व पर्यावरण.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृती: (५) धरणाच्या पाण्याच्या ताटांमुळे धरणाची (बांधण्याची) माती घसरू नये म्हणून मातीच्या उतारावर दगड रचले जातात.लाटा दगडांवर आपटतात व त्या दगडाखालची माती व धरणाचा उतारामुळे सुरक्षित राहतो. (६) तलाव जेव्हा खोल, तेवढे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी व झिरपण्याचे प्रमाण जास्त असे खोल तलाव डोंगराळ भागात बांधता येतात. या तलावात पाणी जिरले तर भूतल पातळी वाढते. विहिरींना फायदा होतो. (७) झाडे लावणे हा बाष्पीभवन कमी करण्याचा उपाय होय. यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा जास्त होते. सर्वसाधारण जमिनीच्या ३३ टक्के जमीन झाडांनी पांघरलेली पाहिजे. संदर्भ : (१) मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (V-1), शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९वी,पान१६३,१६४, प्रकाशन२००६. (२) मूलभूत तंज्ञज्ञानाची ओळख(v-1),शिक्षक हस्तपुस्तिका, इ.१०वी, पाननं ११५-१३०, प्रकाशन २००७ कच्चा बंधारा उद्देश : कच्चा बंधारा बांधण्यासाठी शिकणे. साहित्य : पोती, वाळू, माती इ. साधने : घमेले, फावडे, कुदळ आकृती: पोती (१) प्रथम बंधारा बांधण्यासाठी योग्य जागा निवडा. नैसर्गिकरित्या जिथे छोट्यात छोटी भिंत घालावी लागेल व मागे जास्तीत जास्त पाणी साठा राहू शकेल अशी जागा निवडा. (२) पोत्यात वाळू भरून ती शिवून टाका. (३) त्यांच्या दोन रांगा नाल्यात उभ्या करा. पोती वापरून केलेला कया बंधारा (४) पोत्यांच्या मधील जागेत काळी माती धुमसून भरा. पाझर तलाव : जेथे पाणी अडविण्याचा उद्देश पाणी जमिनीत जिरविणे हा असतो, त्याला पाझर तलाव म्हणतात. पाझर तलावाची जागा निवडताना पुढील बाबींचा विचार करावा. (१) त्या जागेखालील खनिजाची सच्छिद्रता व पार्यतेमुळे त्या जागेवर पाणी जमा होईल का? (२) बंधारा किती खोलवर असावा? (३) बंधारा बांधण्यास माती व दगड कोठून आणायचे? पाझर तलावासाठी खोलगट जागा निवडतात. त्यात एका बाजूला साधारण कठीण दगड लागेपर्यंत खोदून त्यामध्ये काही माती दाबून भरली तर पाणी पाझरून जात नाही. पाण्याचा साठा ज्या उंचीपर्यंत कराचा असेल, त्या उंचीवर पाणी जावयाला वाट करतात. त्याला 'वेअर' (Wear) म्हणतात. पुराच्या वेळी पाणी तलावात भरून वेअर मधून वेगाने जाते, म्हणून तेथे दगड व सिमेंटचे बांधकाम करतात. म्हणजे त्याची झीज होत नाही. तसेच बंधाऱ्याच्या आतील बाजूला पाण्याने झीज होऊ नये म्हणून दगड रचून बसवितात. यालाच "पिचींग' म्हणतात, बंधारा वर निमूळता व तळाशी रुंद असतो. कारण तळाशी पाण्याचा दाब जास्त असतो. ५३