पान:उर्जा व पर्यावरण.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस : सहावा प्रात्यक्षिक : बंधाऱ्याची आखणी व बांधणी करणे. प्रस्तावना : जलसंधारणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे बांधले जातात. गॅबियन बंधारा, वनराई बंधारा, वळण बंधारा अशाप्रकारचे वेगवेगळे बंधारे गरजेनुसार बांधण्यात येतात. शेतीच्या उद्देशाने पाणी साठविण्यासाठी छोटे बंधारे, जमिनीखालचे बंधारे, पाझर तलाव, शेततळी, जमिनीखालील पाणीसाठे तसेच ब्रशवुड प्रकारच्या बंधाऱ्याचा वापर होतो. वाहत्या पाण्याला अडविण्यासाठी लहान बंधाऱ्यांची बांधणी करण्यात येते. लहान बंधारे हे २ फूट उंचीचे असतात. छोटे बंधारे बांधण्यासाठी येणारा खर्च हा कमी असतो व स्थानिक लोकांच्या मदतीने हा बंधारा बांधला जाऊ शकतो. छोटे बंधारे बांधण्यासाठी खालील साहित्य व साधनांची आवश्यकता असते. साहित्य : पोती, वाळू, मोती इ. साधने : घमेले, फावडे, कुदळ पूर्व तयारी: (१) बंधारा बांधण्यासाठी शाळेजवळील किंवा गावातील योग्य जागेची निवड करून ठेवावी. (ज्या ठिकाणी पाणी अडवावयाचे आहे.) (२) बंधारा बांधण्यासाठी लागणारे साधने व साहित्य यांची उपलब्धता करावी. उदा. वनराई बांधारासाठी सिमेंटच्या रिकाम्या बॅग, माती इ. (३) बांधारा बांधण्यासाठी दिवस व वेळेचे नियोजन करावे. (४) विभागामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची गटवार विभागणी करून कामाचे नियोजन/वाटप करावे. उपक्रम निवड : (१) गावातील अथवा शाळेजवळील एखाद्या ओढ्यावर वनराई पद्धतीचा बंधारा बांधा. (२) डोंगरावर समोच्चरेषा खोदून घ्या. (३) डोंगरावरील पाणी आडविण्यास छोटा पाझरतलाव बांधा. (४) बंधारा बांधल्यानंतर त्या ठिकाणी वृक्ष लागवड करा. अपेक्षित कौशल्ये : (१) बंधाऱ्याची लांबी-रुंदी मोजता येणे. (२) समोच्चरेषा मार्क (आखणी) करता येणे. डंपी लेव्हलच्या केलेल्या सर्व्हेनुसार पाण्याच्या खोलीचा अंदाज करता येणे. (४) बंधारा बांधण्याकरिता योग्य जागेची निवड करता येणे. (५) माती भरलेल्या सिमेंटच्या बॅग्जची व्यवस्थित मांडणी करता येणे. (६) बांधण्याची विविध प्रकाराबाबतची माहिती घेणे. विशेष माहिती : (१) अगदी बारीक किंवा चिकणमाती असते त्या बंधाऱ्यामधून पाणी कमी झिरपते. (२) पुष्कळ पाणी अगदी थोड्या वेळात येते तेव्हा पाणी कमी झिरपते. वाळू किंवा भुसभुशीत जमिनीतून पाणी लवकर झिरपते. पाण्याच्या पातळीचा उतार १२ ते १५ मीटर प्रति कि.मी. असेल तर चांगली असते. (३) डपाला ५२