पान:उर्जा व पर्यावरण.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२) एका कागदावर मध्यभागी दुर्बिणीचे ठिकाण निश्चित करून वेगवेगळे बिंदू कागदावर दाखवा. समान उंची असलेले बिंदू निश्चित करा व ते मुक्तहस्ताने जोडा. या रेषांनाच काँटूर म्हणतात. संकल्पना समजावी म्हणून! विद्यार्थ्यांना लेव्हल ट्यूबच्या साहाय्याने शाळेच्या विविध खिडक्या एकाच उंचीवर आहेत ना हे शोधण्यास सांगावे. व्याख्या : समोच्च रेषा (काँटूर) म्हणजे एका ठराविक ठिकाणापासून सारख्या उंचीवर असणाऱ्या ठिकाणांना जोडणारी रेषा होय. शिक्षक कृती : शिक्षकांनी एकदा डंपी लेव्हलची मांडणी करून व वाचन घेऊन एक काँटूर काढून दाखवावे. विद्यार्थी कृती : एकापाठोपाठ एक असे सर्व विद्यार्थ्यांनी स्टाफ उभा करावा. नंतर एकावेळी दोन विद्यार्थी प्रत्यक्ष डंपी लेव्हलची मांडणी करून विविध काँटूर काढतील. काळजी घ्या : डपी लेव्हल वापरताना स्पिरीट लेव्हलमधील बुडबुडा मध्यभागी आहे ना हे वेळोवेळी अवश्य पहा. ट्रायपॉड स्टैंड पडणार नाही अशा रीतीने मांडणी करावी. उपयोग: (१) बंधारा तसेच धरण बांधणे यांसाठी चांगली जागा शोधणे, बंधाऱ्यात किती पाणी साचेल तसेच पाणी कुठपर्यंत साचेल याचा अंदाज करण्यासाठी काँटूरचा उपयोग केला जातो. (२) ठराविक उताराचा रस्ता वा रेल्वे लाईन घालावयाची असल्यास ती कुठे घालावी याचा निर्णय घेता येतो. आकृती अपेक्षित कौशल्ये: (१) डंपी लेव्हल स्टँड व डंपी लेव्हलची लेव्हल काढता यावी. (२) दिशा मार्क करता येणे, बेअरींग (कोन) मोजता येणे. (३) दुर्बिणीमधून स्टाफ वरील रिडींग अचूक वाचता यावे, (४) त्या रिडींगवरून प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर सूत्राच्या साहाय्याने काढता येणे. दुर्बिणीतून दिसणारे दृश्य (५) कॉन्टूर लाईन्स काढता येणे. स्राफ विशेष माहिती दुर्बिणीपासून ते स्टाफपर्यंतचे अंतर खालील सूत्राद्वारे काढता येते. (अप्पर रिडींग - लोअर रिडींग)x100 = अंतर साधारण सपाट जागेवर समोच्च रेषा दूर-दूर असतात. उतार जास्त असतो तेथे समोच रेषा जवळ-जवळ येतात. एकाच जागेतून दोन समोच्च रषा जात नाही किंवा समोच रेषा एकमेकांना ओलांडत नाही. समोच रेषेला सर्वसाधारणपणे टोक नसते. शिखर व खळगा दर्शक समोच्च रेषा साधारणतः सारख्याच दिसतात. बंधारा धरण वगैरेंसाठी चांगली जागा शोधण्यास व किती पाणी साचेल, कुठंपर्यंत साचेल याचा अंदाज करण्यास समोच रेषांचा उपयोग केला जातो. खोदकाम करावयाचे असल्यास कामाचा अंदाज करण्यास उपयोग होतो. संदर्भ : मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख(V-1), शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९वी, पान ७६-८१,प्रकाशन २००६. ५१