पान:उर्जा व पर्यावरण.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९० दिवसांचे बील = १२९१.०५ X व्याज दर ३.५० रुपये प्रति युनिट एकूण ९० दिवसांचे लाईट बील = ४५१८.६७ रुपये संदर्भ : घरगुती विद्युत उपकरणाची दुरुस्ती व निगा शिक्षक हस्तपुस्तिका कार्यानुभव, आवृत्ती २००६ दिवस : पाचवा प्रात्यक्षिक : डंपी लेव्हलचा उपयोग करून समोच्च रेषा मार्क करणे, प्रस्तावना : भारतात विविध भूरूपे आहेत. विविध प्रकारचे पर्वत, डोंगररांगा, पठार व मैदाने आहेत. अशा उंचसखल भागाचा नकाशा काढण्यासाठी डंपी लेव्हलचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशाचे सर्वेक्षण करण्यासाठी या साधनाचा उपयोग केला जातो. या साधनात दूरदर्शनी व स्पिरीट लेव्हलचा वापर करून दूरदर्शनी क्षितिज समांतर रेषेत स्थिर करतात. अशा स्थितीत यातून दिसणारी सर्व ठिकाणे एकाच पातळीतील असतात. दूरदर्शनीत मध्यभागी तारेची फुली असते. त्यांना स्टेडिया म्हणतात. स्टाफवर या दोन स्टेडियामध्ये जेवढे अंतर सें.मी. मध्ये असते. तेवढेच मीटर ते ठिकाण दूरदर्शनीपासून लांब असते. डंपी लेव्हलवर होकायंत्र असते. त्यामुळे दिशा समजते. डंपी लेव्हल व स्टाफ घेऊन एखाद्या भागाची किंवा ठिकाणाची उंची, दिशा व अंतर एकाच वेळी मोजून नकाशा व समोच्च रेषा काढता येतात. नकाशावर उंची दाखविण्यासाठी समोच्च रेषा काढतात. एखाद्या ठिकाणी बंधारा बांधायचा असेल तर त्या बंधाऱ्याची भिंत कुठे असावी, बंधाऱ्यात किती पाणी साठू शकेल, किती जमीन पाण्याखाली येईल हे पहायचे असल्यास त्या जागेचा समोच्च रेषा नकाशा काढावा लागतो. एकाच ठराविक ठिकाणापासून सारख्या उंचीवर असणाऱ्या ठिकाणांना जोडणारी रेषा म्हणजे समोच रेषा होय. पूर्व तयारी: (१) डंपी लेव्हल करण्यासाठी लागणारी साहित्य व साधने गोळा करून ठेवा. उदा. : डंपी लेव्हल, स्पिरीट लेव्हल, स्टाफ, टूप कंपास, ओळंबा, वही, पेन, मीटर टेप, ड्रॉईंग शीट, पेन्सील, खोडरबर इ. (२) जागेचा किंवा ठिकाणाचा सर्व्ह करायचा आहे असे ठिकाण शोधून ठेवा. (३) बंधारा बांधण्यासाठी लागणाऱ्या जागेची निवड करून ठेवा. काँटूर काढण्यासाठी एखाद्या टेकडीची निवड करा. (५) दुर्बिणीद्वारे स्टाफवरील रिडींग घेणे, स्टाफ धरणे, दुर्बिणीपासून ते स्टाफपर्यंतचे तुलनात्मक अंतर टेपच्या साहाय्याने मोजणे यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एका नंतर एक करता येईल असे गट करावे. उपक्रमांची निवड : (१) शाळेच्या जवळपास असलेल्या टेकडीचे समान उंचीवरील बिंदू मार्क करा. गावाच्या जवळपास असलेल्या बंधाऱ्याचा सर्व्हे करून समान उंचीवरील बिंदू मार्क करा. गावाच्या जवळपास बंधारा बांधण्यासाठी सर्व्ह करून पाणी किती साठवेल याचा हिशोब करण्यासाठी समान उंचीवरील बिंदू मार्क करा. उद्देश : डंपी लेव्हलच्या साहाय्याने काँटूर काढणे. साहित्य : डंपी लेव्हल उपकरण, ट्रायपॉड स्टँड, स्टाफ, नोंदवही, पेन इ. GO (२) ४९