________________
स्टोव्ह पेटवताना थोडे रॉकेल पेटवून बर्नरची पेटी गरम करतो. त्या गरम पेटीत टाकीतील तेल नळ्यातून आल्यावर उष्णतेमुळे ते तेल फुटते. उपक्रम : विभागातील, आपल्या शाळेतील किंवा उपलब्ध होणाऱ्या प्रेशर स्टोव्हची दुरुस्ती करा. उद्देश : प्रेशर स्टोव्हचा परिचय करून घेणे. स्टोव्हचे मुख्य भाग -टाकी, पंप, बर्नर आकृती क्र.२ - बर्नर स्टोव्ह पिन -टाकी जॉकेल टाकी (१) टाकी : टाकी लोखंडी किंवा पितळेची असते. त्याला एका बाजूला तेल भरण्यास झाकण असते व हवेचा दाब सोडण्यासाठी चावी असते. टाकीच्या मध्यभागी तेल बर्नरकडे जाण्यासाठी नळी असते. ती नळी टाकीच्या तळापर्यंत पोहोचते. पंपाने हवा भरा. भरल्यावर टाकीच्या वरच्या भागावर तेलाच्या वर दाब येतो व तेल नळीतून बर्नरकडे चढते. स्टोव्ह बंद करतात. चावी उघडल्यावर वरच्या हवेचा दाब जातो व तेल बर्नरकडे जात नाही. असल्या स्टोव्हला प्रेशर स्टोव्ह (दाब) म्हणतात, पंपः हवेचा दाब निर्माण करण्यासाठी टाकीवर लहान पंप बसविलेला असतो. त्या पंपाला एक रॉड असतो. त्या रॉडच्या टोकाला चामड्याचे/रबरी (Cup washer) वॉशर असते. रॉड मागे ओढताना बाहेरच्या हवेच्या दाबाने वॉशर जरा निमुळते होते व हवा आत जाते. रॉड आत जाताना आतील हवा अडते व वॉशर मोठा होऊन हवा बाहेर जाऊ शकत नाही. पंपाच्या टोकाला एक व्हॉल्व बसविलेले असते. रॉड जास्त दाबल्यावर पंपातील हवा या व्हॉल्वद्वारे बाहेर टाकीत जाते. व्हॉल्वची रचना अशी असते की त्यातून हवा एकाच दिशेने जाऊ शकते. पंपातून टाकीत अशारितीने पंप मारल्याने जास्तची हवा भरतात. टाकीत जेवढी जास्त हवा तेवढा दाब जास्त होतो. (३) बर्नर : हवेच्या दाबामुळे तेल टाकीतून बर्नरमध्ये चढत जाते. बर्नरचे ४ भाग असतात, (१) टाकीतून वर जाण्यास दोन नळ्या असतात. त्या नळ्या वरच्या सपाट पेटीला जोडलेल्या असतात, (२) स्टोव्ह पेटवताना आपण थोडे रॉकेल/स्पिरीट पेटवून बर्नरची पेटी गरम करतो. त्या गरम पेटीत टाकीतील तेल नळ्यातून आल्यावर उष्णतेमुळे ते तेल फुटते. याचा अर्थ केरोसिनमध्ये १६ ते २४ कार्बनच्या साखळ्या असतात,त्या फुटतात व त्यात कार्बनच्या साखळीचे तुकडे होऊन गॅस होतो. (३) हा गॅस दुसऱ्या दोन नळ्यांतून परत आतील बाजूस जातो.नळीच्या टोकाला एक बारीक छिद्राचे निप्पल बसविलेले असते. (४) त्यातून बाहेर आलेला गॅस बर्नरच्या पेटीच्या खाली पेटतो व त्यामुळे पेटी सदैव गरम राहते. अशा रितीने बर्नरमध्ये टाकीतील तेल फुटून गॅस बनत राहते. ३२