पान:उर्जा व पर्यावरण.pdf/34

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कार्य :प्रेशर स्टोव्ह : (१) स्टोव्ह पेटवताना प्रथम काकड्याच्या साहाय्याने बर्नर गरम करा. (गरम केल्याने रॉकेलचे रूपांतर द्रवरूपातून वायुरूपात होते, हे वायुरूप रॉकेल निप्पलमधून बाहेर येते व पेट घेते.) (२) आता किल्ली (चावी) बंद करून पंप मारा. हवा भरल्यावर तेलावर दाब येतो व तेल नळीतून बर्नरकडे चढते. तिथे ते गरम होऊन वायुरूपात जाते. (३) वायुरूप रॉकेल पेट घेते व जळत राहते. स्टोव्ह नादुरुस्त होण्याची कारणे : (१) टाकीत प्रेशर राहत नाही : कोणत्याही जागेतून हवेची गळती होत असेल तर हवेचा दाब कमी निर्माण होतो त्यामुळे तेल बर्नरकडे जात नाही. चावी उघडल्यावर आतून हवा बाहेर आलेला आवाज आल्यास हवेचा दाब आत आहे असे समजावे. (२) पंप मारल्यास हवा जात नाही : वॉशर अथवा व्हॉल्व्ह खराब झाल्यास हवा आत जात नाही. (३) बर्नरमध्ये कचरा अडकल्यास : बर्नरची ज्योत कमी जळणे, एकाच बाजूला ज्योत पेटणे ही याची लक्षणे होत. अडकलेली घाण काढण्यासाठी एक तर पिन वापरतात किंवा दुसऱ्या स्टोव्हने गरम करून ती जाळून टाकतात. (४) बर्नरमधून गॅस व्यवस्थित न जळणे - अशा वेळी निप्पल काढून छिद्र साफ करून परत बसवावे. पुष्कळ दीर्घ वापरानंतर बर्नरच्या पेटीत काजळी निर्माण होऊन गॅस नीट येत नाही. अशा वेळी बर्नर हा दुसऱ्या स्टोव्हच्या साहाय्याने गरम करतात व तेल चढण्यासाठी नळीतून हवा सोडून ही काजळी जाळून टाकतात. हा उपाय असफल झाला तर बर्नर बदलावा लागतो इंधन म्हणजे काय ? व ती कोणती? जे पदार्थ कमी तापमानास (ज्वलनांक) पेट घेतात; जळाल्यानंतर भरपूर उष्णता देतात असे पदार्थ आपण इंधने म्हणून वापरतो. केरोसीन (रॉकेल), गोबर गॅस (मिथेन), एल.पी.जी. (ब्युटेन) ही सर्व इंधने ही कार्बन व हायड्रोजनपासून बनलेली असतात. यात कार्बनची साखळी असते. जेवढी साखळी लांब तेवढे ते इंधन जळण्यास कठीण. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये दाबाखाली द्रवरूप ब्युटेन वायू साठवलेला असतो. सिलेंडरमधून बाहेर आल्यावर दाब कमी होतो व द्रवाचा वायू बनतो. आकृती क्र.३ गॅस शेगडी : आपल्या शाळेतील किंवा एखाद्याच्या घरची गॅस शेगडी साफ करा. गॅस शेगडीचे लिकेज ओळखण्याची पद्धती : गॅस शेगडीचे लिकेज साबणाच्या पाण्याने तपासावे. संदर्भ : (१) पॅक्टीकल हँड बुक - ग्रामीण तंत्रज्ञान ४, पान नं. १०१, घटक - प्रेशर व वातीचा स्टोव्ह. ३३