पान:उर्जा व पर्यावरण.pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अ) निप्पल स्पॅनर, ब) व्हॉल्व्ह स्पॅनर, क) पक्कड, ड) नोज प्लायर, इ) स्पॅनर नं.६ ते १८पर्यंत. फ) स्टोव्ह पिन, ग) रॉकेल (अंदाजे/लीटर) इ. वरील साधने आपल्या विभागात असावीत, (२) आपल्याजवळ उपलब्ध असलेली प्रात्यक्षिकासंबंधीची सी.डी. विद्यार्थ्यांना संगणकावर दाखवावी. (३) वातीचा स्टोव्ह, प्रेशर स्टोव्ह व गॅस शेगडी यांची भागांच्या नावासह विभागात पोस्टर्स लावावी. अपेक्षित कौशल्ये: (१) वातीचा स्टोव्ह /प्रेशर स्टोव्ह गळाका (लिकेज) असल्यास तो तपासता आला पाहिजे. (२) वातीच्या स्टोव्हच्या वाती बदलता आल्या पाहिजे. (३) निप्पल स्पॅनरने निप्पल उघडून त्यामधील कचरा व काजळी साफ करणे. (४) व्हॉल्व्ह खराब झाल्यास तो बदलता आला पाहिजे. (५) प्रेशर स्टोव्हचा वॉशर खराब झाल्यास तो बदलता येणे गरजेचे आहे. (६) गॅस शेगडीचे बर्नर साफ करून होल साफ करणे. (७) गॅस शेगडी पेटविता येणे व बंद करणे. (८) गॅस लिकेज तपासणे. (१) गॅस शेगडीची काळजी घेणे, (१०) गॅस शेगडी वेळचेवेळी साफ करणे. उपक्रमांची निवड करणे : वातीच्या स्टोव्हची खोलणी-जोडणी करून परत तपासून पहा. वातीचा स्टोव्ह : त्या स्टोव्हमध्ये केशाकर्षणामुळे तेल वातीतून वर चढते. केरोसीन पूर्णपणे जळण्यासाठी पुष्कळ हवा लागते. ही हवा ज्योतीला मिळाली नाही तर, ज्योत पिवळी येते व भांड्यांवर काजळी जमते. हे थांबविण्यासाठी वातीच्या वर दोन लंबगोलाकार जाळ्या असतात. त्या जाळ्या गरम झाल्यावर बाहेरची थंड हवा आत खेचली जाऊन ज्योत निळी होते. पूर्ण ज्योत निळी झाल्यावर तेलाचे संपूर्ण ज्वलन होत आहे असे समजावे. अशा निळ्या ज्योतीची उष्णता पिवळ्या ज्योतीपेक्षा जास्त असते. ज्योत पिवळी असल्यावर संपूर्ण ज्वलन न झाल्यामुळे तेल जास्त व उष्णता कमी मिळते. स्टोव्ह बंद करताना वात लहान करून कुंकर घालून विझवितात/झाकण बसवितात. तरीही काही वेळ उग्रवासाचा धूर येत राहतो. अशावेळी झाकण घालून धूर अडवावा. कारण तो हानिकारक/अपायकारक असतो. वातीचा स्टोव्ह पेटलेला असताना केरोसीन घालू नये. शक्यतो काही प्रमाणात वात वर खाली करून ज्योत लहान मोठी करता येते. सगळ्या वाती सारख्याच उंचीच्या नसल्यास एका बाजूला (वात मोठी असेल तेथे) जास्त तेल आल्यामुळे पिवळी ज्योत येऊन काजळी धरते. म्हणून वातीचा जळलेला भाग कापून साफ करा व सगळ्या वाती एकाच उंचीच्या करा, वातीच्या स्टोव्हमध्ये वात ओली झाल्यास तेल वर नीट चढत नाही. त्यामुळे टाकीत पाणी आकृती क्र.१ जाणार नाही याची काळजी घ्या. प्रेशर स्टोव्ह: प्रेशर स्टोव्हचे मुख्य तीन भाग असतात, (१) रॉकेल टाकी (२) पंप (३) बर्नर ३१