________________
निरीक्षण ः (१) दोन्ही विरोधामध्ये दाब सप्लाय व्होल्टेज इतका असतो. (२)A=A1 + A2 प्रवाह दोन विरोधात विभागतो. (३) R-R, R, सर्कीटचा एकूण विरोध कमी होतो. कौशल्य संपादनः एकसर व समांतर जोडणीमधील फरक शिकणे. | प्रात्यक्षिक : ब) अर्थिग करणे, घरगुती उपकरणांची दुरुस्ती करणे. | प्रस्तावना : उपकरण किंवा उपकरणाच्या आतील धातुच्या बॉडीमधून लिकेज करंट वाढू लागल्यास तो भाग लाईव्ह (विदयुत भारीत) होतो. वायरवरील इन्सुलेशन खराब झाल्यामुळे अथवा अवाजवी इन्सुलेशन काढून जोडणी केल्यामुळे अथवा लूज कनेक्शनमुळे अथवा इतर काही कारणामुळे वायरचे इन्सुलेशन खराब होते. त्यामुळे उपकरण, यंत्राचे भाग लाईव्ह (विदयुत भारीत) होतात. अर्थिग नसल्यास अशा भागाला हात लागल्यास मशीन वापरणाऱ्या व्यक्तीस गंभीर शॉक बसण्याची शक्यता असते. पण मशीनच्या,उपकरणाच्या धातुचे भाग व्यवस्थित अर्थ केलेले असल्यास मशीनच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीस शॉक बसू शकत नाही. वीज ही नेहमी कमी अडथळे/ विरोध (रजिस्टन्स) असलेल्या पदार्थातून वहाते. तसेच वीज ही जास्त विद्युत दाबाकडून कमी विद्युत दाब (व्होल्टेज) असलेल्या भागाकडे जाते. जमिनीचे व्होल्टेज हे शून्य (०) मानले गेले आहे. म्हणजेच वीज ही जमिनीकडे प्राधान्याने वाहू शकते. लिकेज झालेली वीज ही माणसाच्या शरीरात जाण्यापेक्षा अगोदर सहजपणे जमिनीकडे वाहून नेली जाईल, अशी व्यवस्था करणे म्हणजेच अर्थिंग करणे होय. अर्थिग कंडक्टरचा रोध माणसाच्या/ प्राणिमात्राच्या विरोधापेक्षा (रजिस्टन्स) अतिशय कमी असल्याने सर्कीटमध्ये लिकेज प्रवाह असल्यास अर्थिगच्या तारेतून जमिनीला जातो. त्यामुळे आपणास शॉक टाळता येतो. म्हणून विजेशी संबंधित सर्व उपकरणांना किंवा त्याच्या प्रत्येक भागास अर्थिंग करणे अतिशय आवश्यक असते. उपक्रमांची निवड : आपल्या शाळेत किंवा गावात अर्थिग करणे, (१) प्लेट अर्थिंगबद्दल माहिती गोळा करून विद्यार्थ्यांना द्या. (२) गावात समाजोपयोगी सेवेद्वारे अर्थिंग करून द्या. (३) गावातील एखाद्याच्या किंवा विद्यार्थ्यांच्या घरचे विद्युत उपकरण समाजोपयोगी सेवेत दुरुस्त करून द्या. (४) आपल्या शाळेतील विद्युत उपकरणांना अर्थिग केलेले आहे का, ते तपासून पहा. (५) आपल्या शाळेत अर्थिंग नसलेल्या उपकरणांना अर्थिग करा. पूर्व तयारीः (१) अर्थिग कुठे करायचे ते ठिकाण मुख्याध्यापकांना/संबंधित शिक्षकांना विचारून ठरवावे. (२) अर्थिगबद्दलची व उपकरणे दुरुस्तीबद्दल संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्यापूर्वी द्यावी. (३) अर्थिगसाठी लागणारे साहित्य (वरील यादीनुसार) गोळा करून ठेवावे. अर्थिंग दोन पद्धतीने करता येते. (१) पाईप अर्थिग : जमिनीत खड्डा करून G.. पाईपच्या साहाय्याने अर्थिग केले जाते. (२) प्लेट अर्थिंग : जमिनीत खड्डा करून प्लेटच्या साहाय्याने अर्थिंग केले जाते. (१) पाईप अर्थिंग : साहित्य : लोखंडी जी.आय.पाईप, मीठ, कोळसा, फनेल, लोखंडी कव्हर, अर्थिग वायर इ. साधने : कुदळ,फावडे, घमेले, बादली इ. अर्थिंगची कृती : प्रथम दिलेल्या मापानुसार अर्थिगचा खड्डा खणून घ्यावा. खड्ड्याच्या तळाला अर्थिग प्लेट १९