पान:उर्जा व पर्यावरण.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पकडीची निगा व काळजी (१) पकडीचा उपयोग लोखंडी धातूच्या तारा ठोकण्यास, खिळे उपटण्यास करू नये, (२) गरम पदार्थ धरू नयेत. (३) हातोडीसारखा ठोकण्यासाठी वापरू नये. (४) पकडीच्या मुठीच्या दांड्यावरील इन्सुलेशन खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. (५) पक्कड बरेच दिवस वापरायची नसल्यास तिच्या रिव्हेटवर तेल सोडा, जबड्यास ग्रीस लावून ठेवा. (२) स्क्रू ड्रायव्हर : स्क्रू बसविण्यासाठी अथवा काढण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग होतो. स्क्रू ड्रायव्हरची निगा व काळजी: (१) स्क्रूच्या खाचेनुसार योग्य आकाराचा स्क्रू ड्रायव्हर वापरावा. (२)त्याचे पातेधारदार नसावे. (३) स्क्रू ड्रायव्हरच्या मुठीने काम करताना हातोडीने ठोकू नये, (४) मुठीला तेल, ग्रीस इ.पदार्थ लागू देऊ नयेत. (५) पात्यास योग्य प्रकारे हार्डनिंग व टेंपरिंग केलेले असावे. (३) निऑन टेस्टर (लाईन टेस्टर): याचे पुढील टोक कनेक्टरसारखे असून पाते पोलादी असते व ते काचेच्या अथवा कठीण रबराच्या मुठीत बसविलेले असते. त्याच्या मुठीत पात्याला एक उच्च ओहम्चा विद्युतरोधक (हाय रेझिस्टर) व निऑन लँम्प सिरीजमध्ये जोडलेले असतात. निऑन लॅपचे दुसरे टोक मागील बाजूला असलेल्या क्लिपला जोडलेले असते. जमिनीवर उभे राहून क्लिपवर बोट ठेवून पाते विद्युत पुरवठयाच्या फेजला (प्रावस्था तार) जोडल्यास फेज वायर व शरीरामार्फत अर्थिग मिळून सर्कीट पूर्ण होऊन टेस्टरमधील निऑन लँप प्रकाशित होतो व प्रवाहाचे अस्तित्व समजते. या टेस्टरमुळे फेज वायरचे अखंडत्व कळते. न्यूट्रलचे अस्तित्व समजू शकत नाही. निऑन टेस्टरची निगा व काळजी: (१) टेस्टर वापरताना त्यास आदळ आपट करू नये, (२) आतील लँप व्यवस्थित आहे याची खात्री करा. (३) स्क्रू ड्रायव्हरसारखा वापर करू नये. (४) उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने टेस्टरचा वापर करु नये. (४) टेस्ट लँप : एका पितळी होल्डरला दोन पी.व्ही.सी. वायर्स जोडून टेस्ट लँप तयार करतात. निऑन टेस्टरने फक्त फेज वायरचे अखंडत्व समजते. न्यूट्रलमधील सातत्य (कंट्युनिटी) म्हणजे वायर कुठे तुटली आहे का, हे तपासता येत नाही. टेस्ट लॅपच्या साहाय्याने कंटिन्युईटी, शॉर्ट सर्कीट, ओपन सर्कीट, अर्थिंग आणि पोलॅरिटी टेस्ट घेता येते. थ्री फेज सप्लाय तपासण्याकरिता दोन सारख्या वॅटेज व व्होल्टेज रेटींगचे लँप्स सिरीजमध्ये जोडतात. १०