पान:उर्जा व पर्यावरण.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस : दुसरा प्रात्यक्षिक : अ) हत्यारे, अवजारे ओळख व वापर. प्रस्तावना : विद्युत काम करताना अनेक हत्यारांचा वापर करावा लागतो. या सर्व हत्यारांची माहिती, हत्यारांची योग्य निवड, त्यांची निगा, वापरताना घ्यावयाची काळजी यांचे ज्ञान असणे आवश्यक असते. विद्युत कामातील हत्यारांचे पकडणारी, पिळणारी, ठोकणारी, कापणारी, छिद्रे पाडणारी इ. प्रकारे वर्गीकरण करता येते. उद्दिष्टे : (१) विद्युत व्यवसायातील नेहमीच्या वापरातील वेगवेगळ्या हत्यारांची माहिती देणे. (२) विजेवर चालणाऱ्या पोर्टेबल ड्रिलिंग मशीनची माहिती देणे. विद्युत कामाकरिता नित्य उपयोगात येणारी हत्यारे पुढीलप्रमाणे : (१) पक्कड (प्लायर) : पक्कड घडीव पोलादापासून बनवतात. विद्युत कामासाठी वापरायच्या पकडीच्या मुठीच्या दोन्ही दांड्यावर रबर किंवा सेल्युलाईड यांचे आवरण असते. त्यामुळे वीज दुरुस्तीची कामे विद्युत पुरवठा बंद न ठेवता करता येतात. पकडीच्या डोक्याच्या (तोंडाच्या) आकारावरून (१) चपट्या तोंडाची व (२) निमुळत्या तोंडाची असे दोन प्रकार आहेत. या प्रकारांच्या पकडीचे उपयोग, आकार पुढीलप्रमाणे... (अ) कॉम्बिनेशन प्लायर : या पकडीचा उपयोग तारांना पीळ देणे, तारा तोडणे, तारांना वाकवून आकार देणे, छोटे नट पिळणे यांसाठी करतात. या (अ) एकाच पकडीने अशी अनेक कामे करता येतात. म्हणून हया पकडीला कॉम्बिनेशन प्लायर (संयोजक पक्कड) असे म्हणतात. ही पक्कड म्हणजे चपट्या तोंडाची पक्कड व साईड कटर पक्कड यांचे एकत्रीकरण होय. (ब) लाँग नोज प्लायर : या पकडीचे पुढचे टोक लांब निमुळते असते. अडचणीच्या ठिकाणी काम करण्यासाठी हिचा विशेष उपयोग होतो. तारा धरणे, तारांची तोंडे वळविणे, तारा पिळणे या कामांसाठी या पकडीचा उपयोग करतात. (क) (क) फ्लॅट नोज प्लायर : या पकडीचे पुढचे टोक चपटे असते. या पकडीचा उपयोग छोटे नट पिळणे, अडचणीच्या ठिकाणी काम करणे, तारांना विशिष्ट आकार देणे यासाठी करतात. (ड) साईड कटिंग प्लायर : या पकडीचा उपयोग अडचणीच्या ठिकाणी तारा अचूक तोडणे, जॉईंटच्या तारा अचूक तोडणे,इन्सुलेशन नेमके कापण्यास करतात.