________________
(५) हातोडी (हॅमर) : हातोडी घडीव पोलादापासून बनविलेल्या असतात. हातोडीचे डोक्याच्या आकारावरून बॉलपिन हमर, क्रॉस पिन हमर व क्लॉ हेमर असे तीन प्रकार आहेत. यापैकी बॉलपिन हमरचा उपयोग विद्युत कामासाठी करतात. क्रॉस पिन हॅमरचा उपयोग शीट मेटल विभागात धातुच्या पट्ट्यांना, पत्र्यांना आकार देणे, ठराविक ठिकाणी वळविणे इ. साठी करतात, तर क्लॉ हॅमर हातोडीचा उपयोग सुतारकामात खिळे उपटण्यासाठी व ठोकण्यासाठी करतात. ११५ ग्रॅम ते १ किलोग्रॅम वजनाची हातोडी वापरतात. निगा व काळजी: (१) हातोडीचा दांडा लाकडीच असावा. (२) दांड्यावर तेलकट पदार्थ किंवा ग्रीस लागू देऊ नये. (३) दिल्या दांड्याची हातोडी वापरू नये. (४) टेकससाठी मोठी हातोडी वापरू नये. (५) हातोडी धरताना दांड्याच्या कडेला अंतर ठेवून धरावी. (अ) बॉलपिन हॅमर (ब) क्रॉस पिन हॅमर (क) क्लॉ हॅमर (६) मॅलेट : मॅलेट म्हणजे एक प्रकारची हातोडी आहे. लाकडी, प्लॅस्टिक किंवा रबरी प्रकारच्या मॅलेट असतात. मऊ पदार्थ ठोकण्यासाठी याचा उपयोग होतो. उदा. तांब्याच्या तारा, पातळ पत्रे, वाईडिंग ठोकण्यास, त्यांना आकार देण्यासाठी वापरात. सर्वसाधारणपणे ७५ x १५० मि.मी. आकाराचे व ०.५ ते १ कि.ग्रॅ. वजनाचे मॅलेट वापरतात. निगा व काळजी : मॅलेटचा उपयोग खिळे ठोकण्यासाठी तसेच कठीण धातुवर करू नये. (७) करवत (सॉ) : विद्युत कामामध्ये लाकडी पट्ट्या, केसिंग, कॅपिंग, बॅटन व ब्लॉक कापण्यासाठी टेनन सों व हँड सॉ या करवतींचा उपयोग करतात. (अ) टेनन सॉ:या करवतीच्या पात्याच्या वरच्या बाजूस पितळी/लोखंडी पट्टी असते. या पट्टीमुळे पात्याची ताकद वाढते व लाकूड कापतेवेळी पाते सरळ राहते, परंतु पट्टीमुळे विशिष्ट खोलीपर्यंतच काप घेता येतो. साधारणपणे १० सें.मी. रुंदी व २५ ते ३० से.मी. लांबीच्या पात्याची करवत वापरतात. (ब) हँन्ड सॉ : या करवतीचे पाते लवचिक असून तोंडाकडे निमूळते असते. या करवतीच्या साहाय्याने कितीही खोलीपर्यंत लाकूड कापता येते. पात्याची लांबी २० ते ३५ सें.मी. असते.. निगा व काळजी : (१) करवतीचे दाते चांगले धारधार असावेत. (२) पात्यावर गंज चढणार नाही याची काळजी घ्या, (३) ढिल्या मुठीची करवत वापरू नये. (४) लाकूड कापतेवेळी करवत सरळ धरावी. ११