Jump to content

पान:उर्जा व पर्यावरण.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिम्पल सर्कीटच्या जोडणीकरिता लागणारी साहित्य व साधने: (१) साहित्य : दोन्ही जोडणीकरिता पूर्ण सर्कीट बोर्ड (होल्डरव वनवे स्विच लावलेला) वेगवेगळ्या वॅटचे बल्ब (दिवे), वेगवेगळ्या रंगाच्या व वेगवेगळ्या आकाराच्या वायर्स. उदा. १/१८ इंच ची वायर. (२) साधने : टेस्टर, स्क्रू ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियनचा चाकू, इन्सुलेटेड पक्कड, वायर कटर पूर्वतयारी : (१) वेगवेगळ्या संकेतिक चिन्हांचे नकाशे, वेगवेगळे इलेक्ट्रीकल सर्कीट डायग्राम्स गोळा करणे, (२) सांकेतिक चिन्हांच्या संदर्भाने इलेक्ट्रिकल उपकरणे गोळा करणे. उदा. बल्ब, चोक, अॅमीटर, व्होल्टमीटर, टू वे स्विच, वन वे स्विच इ. (३) प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य, साधनांची जुळवणी (४) प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या वेळेचे नियोजन करणे. (५) स्वतः अगोदर प्रात्यक्षिक करून पाहणे. उपक्रमांची निवड : (१) नकाशातील सांकेतिक चिन्हांना अभ्यासा. (२) रस्त्यावरील सांकेतिक चिन्हांचे निरीक्षण करा. (३) इलेक्ट्रिकल सर्कीट डायग्रामच्या सांकेतिक चिन्हांचा अभ्यास करा. (४) MSED च्या सब स्टेशनला भेट द्या. (५) वेगवेगळ्या प्रकारची सर्कीट जोडणी करून पहा. (६) खालील सर्कीटची जोडणी सराव करा. (१) एका स्विचने एकसर जोडणी पद्धतीने (२) एका स्विचने एकसर जोडणी पद्धतीने दिवे दोन दिवे नियंत्रित करा (आकृतीच्या आधारे) नियंत्रित करा. (आकृतीच्या आधारे) LL ML N= न्यूट्रल P= फेज PS s= स्विच समांतर जोडणी: (१) एका स्विचने समांतर जोडणी पद्धतीने (२) एका स्विचने समांतर जोडणी पद्धतीने तीन दिवा नियंत्रित करा (आकृतीच्या आधारे) दोन दिवे नियंत्रित करा.(आकृतीच्या आधारे) N N AC N 2300 132535 PS (३) आपल्या वर्गखोलीचा/घराचा सर्कीट डायग्राम सांकेतिक चिन्हांच्या आधारे काढा. विशेष माहिती : (१) विजेचे काम करत असताना पायात स्लिपर, बूट असले पाहिजेत. (२) मेन स्विच कुठे आहे व कसा चालू व बंद करावा याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. (३) शॉक लागण्याची कारणे व त्यावरील प्रथमोपचार मुलांना समजावून द्यावेत. (४) साहित्याची माहिती मुलांना द्यावी. (५) प्रात्यक्षिक संपल्यानंतर साहित्य त्या-त्या ठिकाणी ठेवावे. (६) प्रात्यक्षिक संपल्यानंतर सर्व बटण बंद असल्याची खात्री करूनच घरी जा. संदर्भ : (१) शिक्षक हस्तपुस्तिका V-3, इ.९वी, पान नं.१८९-१९१, प्रकाशन २००६. (२) शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९ वी, पान नं.१४६. (३) इयत्ता १०वी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, धारा विद्युत, पान क्र.५१-५५, प्रकाशन २००७.