पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/161

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ उत्तररामचरित्र नाटक, ( असे झणून मूर्छ पावते.) लक्ष्मण-(रामाच्या पायांवर मस्तक ठेवून ह्मणतो,) हे आर्या रामा, आनंदाची गोष्ट आहे. रघुवंशाला कल्याण रूप अंकूर उद्भवला. ( रामाच्या मुखाकडे पाहून,) हायहाय, प्रभूच्या डोळयांतून तर अश्रूचे लेट चुलले आहेत. हा अगदीं मोहित झाला असे वाटतें.(पदरानें वारा घालतो.) आर्या सावधही. गंगा, व पृथ्वी-वन्से जानकी, सावधहो, सावंधहो. सीता--(सावध होऊन त्यांस ह्मणते.) बाई तुझी कोण दोधी? पृथ्वी-वन्से ही तुझ्या सासच्याबी कुल देवता भागीरथी ॥ सीता-देवी, तुला माझा नमस्कार असेो. गंगा-मुली पातिव्रत्याने संपादित आणि लेोकमान्य अशी कल्याण संपत्ति तुला प्राप्त होवी. लक्ष्मण-हा आह्मांवर अनुग्रहच आहे. गंगा-ही तुझी जननी वसुंधरा. सीता-हा माते वसुंधरे, अशा अवस्थेत तूं मला पाहतेस ना? प्रथ्वी-अगे वन्से, अगे मुली. इकडे मजजवळ ये. _ ( सीतेला आलिंगून मूर्छ पावते.) लक्ष्मण-(हर्षानें.) पूथ्वी आणि भागीरथी ह्या दोधी जान कीला सहायझाल्या, आता चिता नाही. राम-०(तिकडे पाहून,) हरहर काय कष्टहे. ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. *सर्वसहेलाही हें हुःख असह्य झाले. तस्मान् हा अपत्यस्नेह मोठा दुर्धर अहे. अथवा हा

  • सर्व सोसणारी जी पथ्वी तिलाही.