पान:इहवादी शासन.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८४ । इहवादी शासन
 

इस्लामाचें आक्रमण झालें. आक्रमकांनी इराणी जनतेला सक्तीने बाटविण्यास प्रारंभ केला. तेव्हा ज्यांना हा धर्मच्छळ असह्य झाला असे कांही सात-आठशे लोक तेथून निसटून भारतांत आश्रयास आले व तेव्हापासून ते येथेच आहेत.
 असे असूनहि पारशी जमातीचा या विभागांत समावेश करण्याचें कारण असें की, पारशी लोक पूर्णपणे भारतनिष्ठ आहेत. इराण या त्यांच्या मूळ भूमीशीं त्यांचा आज कसलाहि संबंध नाही. शिवाय मूळचे इराणी म्हणजे आर्यांचीच एक शाखा होती व त्यामुळे आपणहि आर्य आहों, असा पारशी लोक आजहि अभिमान बाळगतात. सायरस, दरायस, झर्सीस यांचा वारसाहि त्यांना भूषणावह वाटतो. ते अग्निपूजक आहेत हें तर त्यांच्या आर्यत्वाचें निश्चित लक्षण आहे. सातव्या शतकांत पारशी लोक येथे आले तेव्हा दीव, दमण, संजाना या गुजरातेंतील बंदरांत ते उतरले व जयदेव या राजाने त्यांना आश्रय दिला. त्या वेळी त्यांनी गुजराती ही भाषा स्वीकारली व आज तीच त्यांची मातृभाषा आहे. त्यांनी हिंदूंच्या चालीरीति स्वीकारल्या आणि दुधामध्ये साखर जशी मिसळून जाते तसे आम्ही हिंदु समाजांत मिसळून जाऊं, असें राजा जयदेव याला आश्वासनहि दिलें. त्याप्रमाणे पारशी समाज रक्ताने जरी हिंदुसमाजांत मिसळून गेला नाही, तरी या समाजाच्या हिताहिताशीं तो एकरूप होऊन गेला असून, भारताच्या हितसंबंधाशी सर्वस्वीं एकजीव होऊन गेला आहे. तेव्हा जैन, बौद्ध, शीख यांची भारतनिष्ठा हिंदूंप्रमाणेच अव्वल व विशुद्ध आहे असें जें वर म्हटलें आहे तेच सर्वार्थाने पारशी समाजाच्या बाबतींतहि खरें आहे आणि म्हणूनच ते वाच्यार्थाने हिंदु नसले, तरी त्यांचा विचार याच विभागांत करणें सयुक्तिक वाटतें. मात्र जैन-बौद्धांचा जसा फक्त इहवादाच्या दृष्टीनेच विचार केला तसा पारशी समाजाचाहि विचार केवळ त्याच दृष्टीने करावयाचा आहे. इहवादाच्या दृष्टीने त्यांचें भारताला देणें काय आहे तेंच फक्त येथे पाहवयाचें
 झरतुष्ट्री धर्माची स्थापना झाली तेव्हापासूनच परधर्मसहिष्णुतेचें तत्त्व त्याने मान्य केलेलें आहे. हद्दपार होऊन वणवण भटकणाऱ्या, वनवासी झालेल्या ज्यू लोकांना सायरस या प्राचीन सम्राटाने उदार आश्रय दिला, असा बायबलच्या जुन्या करारामध्ये त्याचा गौरव केलेला आहे. सातव्या शतकांत पारशी लोक येथे आले तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी हिंदूचें धर्मांतर करण्याचा कधीहि प्रयत्न केला नाही. तेव्हा ते अगदी अल्पसंख्य होते हें खरें पण प्रारंभी आलेले ख्रिश्चनहि तसेच होते. पण जग ख्रिश्चन करून सोडावे अशी ख्रिश्चनांची धर्माज्ञाच आहे. तशी झरतुष्ट्री धर्माची नाही. निदान पारशी तशी मानीत नाहीत, एवढे खरें. आज ख्रिश्चनांप्रमाणेच पारशीहि लोकसेवा, परोपकार, दानशौर्य यांत अग्रगण्य आहेत. इस्पितळें पंगुगृहें, शाळा, प्रशाळा, कलाविद्यालयें यांना त्यांनी लाखांनी कोटींनी दानें दिलीं आहेत. अजूनहि ते देतात. पण याच्या मागे या संस्थांतून आश्रयाला किंवा विद्येसाठी आलेल्यांचें धर्मांतर करावें, त्यांना बाटवून पारशी करावें, असा अंतःस्थ हेतु धनिक