पान:इहवादी शासन.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रमुख धर्मपंथांचें कार्य । २७९
 

 प्रा. धर्मानंद कोसांबी हे गौतमबुद्ध, बौद्ध धर्म व पाली साहित्य यांचे फार मोठे उपासक व पंडित होते. 'भगवान् बुद्ध' या आपल्या ग्रंथांत, बौद्ध श्रमणांना जातिभेद मोडतां आला नाही, असें त्यांनी स्पष्ट म्हटलें आहे. ते म्हणतात, "बुद्धाला व त्याच्या शिष्यांना जातिभेद पसंत नव्हता, तो मोडून टाकण्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली. परंतु हें कृत्य त्यांच्या आवाक्याबाहेरचें होतें. ब्राह्मणांनी त्याची लागवड करून ठेविली होती. तो उपटून टाकणें कोणत्याहि श्रमण संघाला शक्य झालें नाही (पृष्ठ २३६). जास्तीत जास्त त्यांना काय साधलें? श्रमण संघांत किंवा बौद्ध संघांत जातिभेद पाळला जात नसेल एवढेच. बौद्ध पंथ स्वीकारलेल्या समाजामध्ये जातिभेद होताच. नव्हे त्याला बौद्धश्रेष्ठांची मान्यता होती. "विवाहाच्या वेळीं जातीचा विचार करणें योग्य आहे, धार्मिक बाबतींत मात्र जातीचा विचार करण्याचें कारण नाही" अशा अर्थाचें वचनच प्रा. कोसांबी यांनी दिलें आहे (पृष्ठ २३८).

अस्पृश्यांची परिस्थिति

 अस्पृश्यतेच्या बाबतींत हेंच घडलें. कोसांबी म्हणतात, "ग्रीक, शक, हुण यांनी बौद्ध व जैन होऊन हिंदु समाजांत प्रवेश केला. पण अस्पृश्यांची परिस्थिति सुधारली नाही. जैन व बौद्ध श्रमणांनी त्यांची हेळसांड केली व त्यामुळे उत्तरोत्तर अस्पृश्यां- विषयी तिटकारा वाढत गेला व नाहक त्यांचा छळ होऊं लागला" (पृष्ठ २४१) रिचर्ड फिक् यांच्या 'बुद्धकालीन भारतीय समाज' या ग्रंथाचा उल्लेख वर केला आहे. उत्तर प्रदेशांतील एक विद्वान् गृहस्थ पंडित मोहनलाल महतो वियोगी यांनी 'जातककालीन भारतीय संस्कृति' या आपल्या ग्रंथांत रिचर्ड फिक् यांच्याच मताला पुष्टी दिली आहे.
 जैन पंथाने सुद्धा ब्राह्मणांपासून शूद्र-चांडाळांपर्यंत सर्वांनी आपसांत विवाह करावे असें सांगितलें असल्याचें सिद्ध झालेले नाही. तेवढे सोडून समता, गुणकर्मावरून योग्यता इत्यादि सर्व विचार वैदिक धर्मीय ग्रंथांत शेकडो वेळा सांगितलेले आढळतात. पण हा मुद्दा वादग्रस्त म्हणून सोडून दिला, तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, इ. स. दहाव्या शतकाच्या सुमारास हिंदु धर्माला अवकळा येऊ लागली त्या वेळी या पंथांनी समाजाला सावरण्याचा कसलाहि प्रयत्न केलेला आढळत नाही. बौद्ध धर्म तर या काळापर्यंत भारतांतून नाहीसाच झाला होता. पण जैन धर्म चालू होता. पण इ. स. च्या पहिल्या शतकापासून त्यांच्यांतच अनंत पंथोपपंथ व जातिभेद निर्माण व्हावयास प्रारंभ झाला होता.
 हिंदु धर्मांत या वेळी शब्दप्रामाण्य प्रस्थापित झालें. शास्त्रांचें संशोधन थांबलें, विद्यापीठें जड ज्ञानाची उपासक झाली. प्रवृत्तिधर्माचा ऱ्हास होऊन ऐहिकाची उपेक्षा सुरू झाली. निवृत्तिवाद, संन्यासवाद बळावला. जाति-पोटजातींचा प्रादुर्भाव झाला. उच्चनीच भाव फार तीव्र झाला. कलियुग कल्पना रूढावली, जात बाटण्याच्या भयाने