पान:इहवादी शासन.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५८ । इहवादी शासन
 

 झेवियरने धर्माच्या नांवाने केलेले सैतानी अत्याचार व बुद्धाची विटंबना आजहि ख्रिस्ती पाद्री भूषण म्हणून मिरवितात, असा याचा अर्थ आहे. (झेवियर अत्याचारासाठी पाहा- गोवा इन्क्विझिशन- प्रियोळकर, पृष्ठ २३, ५०).
 महात्माजींनी ख्रिश्चनांना सहिष्णुता, धर्मसमानत्व हीं तत्त्वें शिकविलीं व त्यामुळे त्यांचा वृत्तिपालट झाला असें कोणी म्हणतात. पण तसें कांहीहि झालें नसल्याचें मिशनरी शाळांनी गांधी- शताब्दि वर्षांत दाखवून दिले आहे. गांधी- शताब्दी सर्व शाळांनी पाळून त्यासाठी तसे कार्यक्रम करावे, असें सरकारी परिपत्रक निघालें होते. पण एकंदर चौदा कॉन्व्हेंट शाळांनी हें परिपत्रक अवमानिलें व शताब्दीचा कार्यक्रम करण्यास नकार दिला, असें महाराष्ट्र विधानसभेत सरकारनेच सांगितलें. एका कॉलेजांत तर २ ऑक्टोबरलाच महात्माजींचा फोटो प्राचार्यांच्या आज्ञेवरून काढून फेकून देण्यांत आला.
 गेल्या वर्षी 'इलस्ट्रेटेड वीकली'च्या एका अंकांत (२८-१२-६९) सौ. जॅमिला व्हर्गीज यांनी एका लेखांत, ख्रिश्चनांनी भारताची जी सेवा केली आहे तिचें विस्ताराने वर्णन केलें आहे. भारतांत ख्रिश्चनांनी २१७७ शाळा, १५० महाशाळा, ६२० रुग्णालये, ८६ कुष्टरोगनिवारण केन्द्रे, ७१३ अनाथ बालकाश्रम, ४४ कृषि वसाहती आणि अंध, पंगु यांसाठी कित्येक गृहें अशा संस्था स्थापिल्या आहेत आणि त्यांतून आजहि समाजसेवेचें कार्य अखंडपणे चालविलें आहे. हे प्रचंड कार्य पाहून कोणाचेहि डोळे दिपून जातील यांत शंकाच नाही.
 हें कार्य बव्हंशी ख्रिश्चन मिशनऱ्यांचें आहे आणि त्यांतहि तें बहुधा परदेशी मिशनऱ्यांचें आहे. ही सेवा फार मोठी आहे, याबद्दल दुमत होणार नाही. असें असूनहि महात्माजी, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याबद्दल अत्यंत कटु शब्दांत का लिहितात आणि अमृतकौर व स्टॅनले जोन्स यांसारखे प्रौढ ख्रिश्चन लोक महात्माजींचे त्या टीकेसाठीच आभार को मानतात, असा प्रश्न येतो. वर निर्देशिलेल्या इंडियन नॅशनल चर्चचे आर्चबिशप विल्यम्स, डॉ. कुन्हा, ब्रदर रॉडरिगस यांसारखे नेते परदेशी मिशनरी व त्यांचे स्वदेशी हस्तक यांचा असाच निषेध करतात व त्यांना भारतांतून हाकलून लावा, असा दरसाल ठराव करून भारत सरकारला नित्य अर्ज करीत असतात, असें कां व्हावें ?

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर

 याचें प्रधान कारण असें आहे की, धर्मांतर हे राष्ट्रांतर होय हा सिद्धान्त ख्रिश्चनांच्या बाबतीत फार खरा ठरत आहे. स्टॅनले जोन्स यांनी म्हटले आहे की, 'असहकारितेच्या लढ्यांत कांही ख्रिश्चन सामील झाले असले, तरी अधिकांश ख्रिश्चनांना ब्रिटिश राज्य कायम राहवें असें वाटत होते. स्वातंत्र्य आलें तर आपल्या ख्रिश्चन धर्मप्रसाराचें काय होईल, याची त्यांना भीति वाटत होती." जोन्स पुढे