पान:इहवादी शासन.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इहवाद व
ख्रिश्चन समाज




 भारतांतील ख्रिश्चन जमात व ती मानीत असलेला व आचरीत असलेला ख्रिश्चन धर्म ही इहवादविरोधी शक्ति आहे काय याविषयी निर्णय करतांना अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांचीं जीं उत्तरे मिळतील त्यावर हा निर्णय अवलंबून राहील.
 बायबल या आपल्या धर्मग्रंथाकडे चिकित्सक बुद्धिवादाच्या दृष्टीने ख्रिस्ती लोक पाहू शकतात काय? देश-काल-परिस्थिति पाहून जीझसच्या वचनांचा नवा अर्थ लावणें त्यांना मंजूर आहे काय? पोपसारख्या धर्मपीठस्थ आचार्यांना ते प्रमादक्षम मानतात, की त्यांचीं वचनें शब्दप्रामाण्यबुद्धीने ते स्वीकारतात? सर्वधर्मसमानत्व, धार्मिक सहिष्णुता ख्रिस्ती धर्माने मान्य केली आहे काय ? मनुष्य आपल्या धर्मा- प्रमाणे श्रद्धेने आचरण करीत राहिला, तर तो कोणत्याहि धर्माचा असला, तरी त्याला मुक्ति मिळेल, त्यासाठी ख्रिस्ती धर्म त्याने स्वीकारला पाहिजे असें नाही, हें तत्त्व ख्रिश्चनांना मान्य आहे काय?
 मानवत्वाची प्रतिष्ठा हा लोकशाहीचा पाया आहे. लोकशाही ही माणसाकडे माणूस म्हणून पाहते. तो कोणत्या धर्माचा, वंशाचा, जातीचा आहे हा विचार तिच्यालेखीं वर्ज्य आहे. ख्रिश्चन लोक तत्त्वतः व व्यवहारतः हें तत्त्व स्वीकारतात काय ? परधर्मी माणूस कितीहि मोठा असला तरी मुस्लिम लोक त्याला हीन मुस्लिमांहूनहि हीन समजतात. ख्रिश्चन लोकांची याबाबत काय वृत्ति आहे? खिश्चन जमातींत जातिभेद, जन्मनिष्ठ उच्चनीचता आहे की नाही? आदिवासी, अस्पृश्य या भारतीय जमातींत मिशनरी लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतराची मोहीम चालविली आहे. हें धर्मांतर करतांना खिश्चन मिशनरी मानवत्वाची प्रतिष्ठा सांभाळतात काय? म्हणजे ख्रिस्ती धर्माची तत्त्वें त्या जमातीच्या लोकांच्या बुद्धीला पटवून देऊन ते धर्मांतर करवितात का कांही ऐहिक विलोभने दाखवून ते धर्मांतर