पान:इहवादी शासन.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २३९
 

त्यावरून देशाचे तुकडे करण्याच्ची इच्छा करणाऱ्यांना येथे वाव आहे असें दृष्टोपत्तीस येतें." (साधना, दि. ४- १- १९६९).
 मुस्लिमांच्या या पाकिस्तानी आकांक्षांना हिंदु समाजाने इहवादी होणें हें एकच उत्तर आहे. इहवादावांचून तो संघटित होणें शक्य नाही. कारण जातिभेद, चातुर्वर्ण्य अस्पृश्यता यांचीं मुळें पोथींत आहेत, अंधश्रद्धेत आहेत. शेकडो वर्षे हा समाज इहवादशून्य होऊन शब्दप्रामाण्याच्या आहारी गेला आहे. वेदबंदी, स्पर्शबंदी, शुद्धिबंदी, सिंधुबंदी, रोटीबंदी. बेटीबंदी व व्यवसायबंदी या सात शृंखला त्याने आपण होऊन आपल्या पायांत ठोकून घेतल्या आहेत. त्या नसत्या तर भारतांत मुस्लिम कोटि संख्येने दिसलेच नसते. शुद्धि-बंदीमुळे ते दिसत आहेत. स्पपर्शबंदी नसती तर कोट्यवधि हरिजन आज नरकांत पिचत पडले नसते. आरंभीचा एकवर्णी समाज या शृंखलांमुळे हजारो जातींत छिनला जाऊन विस्कळित, असंघटित अणि म्हणूनच दुबळा झाला. अजूनहि त्या शृंखला तुटलेल्या नाहीत. त्यामुळेच लक्षावधि लोक धर्मांतर करीत आहेत. हेंच चालू राहिलें तर भारतांत, एखादे हिंदुस्थान हि असावें, अशी मागणी करण्याची हिंदूंना वेळ येईल. तेव्हा वेळींच सावध होऊन राष्ट्रसंघटनेची चिंता हिंदूंनी वहावी.
 'टाइम्स ऑफ इंडिया'चे संपादक गिरिलाल जैन यांनी 'कम्युनल प्रॉब्लेम' या शीर्षकाचे दोन लेख लिहून या विषयाचें मोठें उद्बोधक विवेचन केलें आहे. (टाइम्स, दि. २२, २३ ऑक्टोबर १९६९). त्याचा मतितार्थ देऊन या लांबलेल्या विवेचनाचा समारोप करूं. जैन म्हणतात, 'प्रत्येक देशांत कोणती तरी एक प्रभावी जमात राष्ट्रसंघटनेचें कार्य करीत असतें. रशियांत ग्रेट रशियन, जर्मनीत प्रशियन, चीनमध्ये हन, ब्रिटनमध्ये इंग्लिश, यांनी हें कार्य केलें आहे. हिंदुस्थानांत ही जबाबदारी हिंदूंची आहे. याचा अर्थ असा नव्हे की, हिंदूंनी हिंदुधर्मीय राष्ट्र करावें. राष्ट्र सर्वांचेच झालें पाहिजे. पण तें घडविण्याची जबाबदारी हिंदूंची आहे. कारण हिंदु हे धर्मातीत इहवादी दृष्टि स्वीकारूं शकतात. आपली प्राचीन संस्कृति फार श्रेष्ठ होती ही जाणीव फार महत्त्वाची आहे. पण तो अभिमान धरूनहि हिंदु आधुनिक झाले, पूर्ण राष्ट्रीय झाले. परंपरेच्या अभिमानाने ते संकुचित झाले नाहीत. टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. अरविंदबाबूंनी भारताची कालीमातेशीं तुलना केली; गांधींना रामराज्य स्थापावयाचें होतें. तरी या सर्वांना इहवादी लोकायत्त राष्ट्रच अभिप्रेत होतें.
 "याउलट बहुसंख्य मुस्लिमांनी शब्दप्रामाण्यवादी, अंधश्रद्धा लोकशाही- विरोधी व इहवादविरोधी अशा उलेमांचे नेतृत्व स्वीकारलें. त्यामुळे त्या जमातीने विभक्त वृत्तीची जोपासना करून राष्ट्रीय प्रवाहांत एकरूप होण्याचें नाकारलें. आता यापुढे हा मुस्लिम समाज जर असाच जीर्णवादी व पोथीबद्ध राहून समाजसुधारणेला विन्मुख होऊन बसेल तर त्याचें जीवन जड व चैतन्यहीन होईल. त्यामुळे त्या