पान:इहवादी शासन.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २३५
 

या वृत्तीमुळे हिंदु-मुस्लिम समस्या अधिक बिकट होते व त्याचे परिणाम अप्रत्यक्षपणें सर्व मुसलमान नागरिकांना भोगावे लागतात." असा भावार्थ असलेली मुस्लिम तरुणांचीं अनेक पत्रे वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेलीं आहेत. "उद्याची मुसलमान पिढी ही सुधारणा घडवून आणणारच-" असा निर्धार त्या पत्रांतून या तरुणांनी व्यक्त केला आहे, ही फारच आशादायक गोष्ट आहे. तेव्हा मुस्लिम तरुणांनी चालविलेलें हें जें प्रबोधनाचें कार्य त्याला हिंदूंनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने यावच्छक्य साह्य केलें पाहिजे.

पुन्हा तीच भाषा

 पण या प्रयत्नावर सर्वस्वी अवलंबून राहणें धोक्याचें होईल; कारण त्यांचा परिणाम दिसायला दीर्घकाल लागेल आणि आज देशांत पाकिस्तानपूर्व कालाप्रमाणे, १९४० ते १९४७ या सात-आठ वर्षातल्याप्रमाणे दुसऱ्या पाकिस्तानचे वारे वाहूं लागले आहेत. मुस्लिम समाज नेते पुन्हा 'डायरेक्ट ॲक्शन' ची भाषा बोलूं लागले आहेत व तो समाज तशी कृति करूं लागला आहे. तेवीसपैकी बावीस दंगे मुस्लिमांनी सुरू केले याचा दुसरा काय अर्थ आहे ? आम्हांला दुय्यम नागरिक म्हणून वागविलें जातें, इस्लामचा नाश करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी त्यांची ओरड सुरू आहे. पण आपण मोगल कालाप्रमाणे सत्ताधारी आहों, अशी प्रत्यक्षांत मुस्लिमांची वागणूक आहे.
 शिवजयंती, रामलीला, गणेशोत्सव या मिरवणुकींवर ते हल्ले करतात, कत्तली करतात आणि प्रतिकार झाला की, इस्लाम धोक्यांत आहे, असा ओरडा करतात आणि त्याच्या संरक्षणासाठी स्वतंत्र मुस्लिम संघटना स्थापिली पाहिजे, स्वसंरक्षणासाठी प्रत्याघात केला पाहिजे, अशी चिथावणी देतात. नोव्हेंबर १९६७ मध्ये हैदराबाद येथे भरलेल्या जमाते इस्लामीच्या परिषदेत सहचिटणीस सय्यद हमीद हुसेन म्हणाले, "आपले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता मुस्लिमांनी तिसरा प्रभावी गट म्हणून संघटित झालें पाहिजे." ७ नोव्हेंबर १९६७ च्या 'दावत'च्या अंकांत मुस्लिमांच्या स्वतंत्र संघटनेचें आवाहन केलेलें आहे. १९६७ साली मुशावरतचे अध्यक्ष डॉ. सय्यद महमूद यांनी वार्ताहरांना मुलाखत देऊन हीच घोषणा केली- "मुस्लिमांनी सरकारवर अवलंबून न राहतां स्वसंरक्षणासाठी उघडपणें बलिष्ठ संघटना उभी केली पाहिजे व स्वसंरक्षणासाठी प्रत्याघात करण्याचीहि तयारी ठेवली पाहिजे." (भारतीय मुस्लिम, आव्हान आणि आवाहन, उर्दू प्रेस, हसनैन, पृष्ठे १४२, १४९).
 यांतील प्रत्याघात शब्दाचा अर्थ, बहुतेक दंगे मुस्लिांनी सुरू केले होते या सरकारी अहवालाच्या आधारेंच केला पाहिजे. पूर्वीच्या लीगची डायरेक्ट ॲक्शन हाच त्यांचा अर्थ आहे.