पान:इहवादी शासन.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २३३
 

उस्मानी तुटून पडले आहेत. ते म्हणाले, "त्यांना नेहरूंच्या आत्म्याची काळजी होती तर त्यांनी त्यांना जिवंतपणींच कलिमा पढावयास सांगावयाचें होतें. तसें त्यांनी केलें नाही. तेव्हा नेहरूंच्या आत्म्याला मुक्ति मिळण्याची आशा नाही." देवबंद पंथाचे मौ. तायव यांनीहि हा कुराणाचा अपमान आहे, असेंच म्हटलें आहे. (दावत, १०, २० जून १९६४). शेवटीं दावतचे संपादक म्हणतात, "आपण अज्ञेयवादी आहों असें भासवून जन्मभर नेहरूंनी लोकांची दिशाभूल केली. खरें म्हणजे ते पक्के सनातनी हिंदु होते." (उतारे - दावत, इस्लाम, इन् इंडियाज् ट्रँझिशन- करंदीकर, पृष्ठ ३२५).
 जन्मभर नेहरूंनी हिंदूवर अन्याय केला, पक्षपात केला. विषमनीति अवलंबून मुस्लिमांचा अनुनय केला. स्वातंत्र्यानंतरहि लीगशी सहकार्य केलें. पाकिस्तानवर प्रेम केलें, तरी मुस्लिम संतुष्ट नाहीत. गोळवलकर गुरुजी व नेहरू त्यांना सारखेच वाटतात. मुस्लिम केव्हा संतुष्ट झाले असते? नेहरू मुसलमान होऊन कलिमा पढूं लागले असते तर !
 अशा परिस्थितीत हिंदु-मुस्लिम समस्या कशी सुटेल याचा वास्तव भूमिकेवरून विचार केला पाहिजे.

१०


 मुस्लिम अल्पसंख्य आहेत तेव्हा बहुसंख्याकांनी त्यांना सांभाळन घ्यावें, त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करावें, कोठे पड खावी, कोठे तडजोड करण्यास तयार व्हावें, असा हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी जे उपदेश करतात त्यांनी मुस्लिमांच्या या अपेक्षा ध्यानीं घेऊन व भारताची परंपरा, हिंदु धर्म, भारताची घटना यांविषयी मुस्लिम समाजाची जी मनोवृत्ति दिसते तिचा हिशेब करून मग भाषणें करावीत, अशी माझी त्यांना विनंती आहे.
 त्या भाषणांत मुस्लिमांचे कोणकोणते आग्रह मान्य करण्यास आपण तयार आहोंत तें त्यांनी स्पष्टपणें सांगावें. भारताची प्राचीन परंपरा आपली मानणें मुस्लिमांना मान्य नाही, संस्कृत भाषा त्यांना वर्ज्य आहे, मानवकृत कायदा मुस्लिम मानणार नाहीत. अर्थात् लोकशाही निषिद्धच ठरली ! काँग्रेस नेत्यांना हें मान्य आहे काय ? 'इहवाद' हें पाप आहे, असें मुस्लिम समाज मानतो. सर्वधर्मसमान मानणें हे तेवढेंच मोठें पाप होय. त्यामुळे गांधी, नेहरू हे जोंपर्यंत मुसलमान होत नाही तोपर्यंत ते मुस्लिमांना आदरणीय होणार नाहीत. बाह्य जगांतील मुस्लिम हिंदी मुस्लिमांना इतर भारतीयांपेक्षा जवळचे वाटतात, म्हणजे विश्व- मुस्लिमवादाचा त्यांचा आग्रह कायम आहे. इंदिराजी, चव्हाण यांना याबद्दल काय म्हणावयाचें