पान:इहवादी शासन.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २२७
 

माहितीवरून दिसून येईल. राम, कृष्ण, शिवाजी, राणा प्रताप यांना विसरावें लागेल. संस्कृत भाषा त्याज्य मानावी लागेल आणि मुस्लिम बादशहाच्या जनानखान्यांत जाण्यापेक्षा मरण पत्करणें बरें असें म्हणणाऱ्या हिंदुकन्यांची चरिलें पाठ्य- पुस्तकांना वर्ज्य मानावी लागतील. तसें करण्यास तयार असणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी लोकसभेंत तशीं भाषणें करावीं म्हणजे हिंदूंना दोष देणाऱ्या, त्यांच्यावर जबाबदारी टाकणाऱ्या त्यांच्या शब्दांना अर्थ प्राप्त होईल.


 मुस्लिमांच्या सर्व मागण्यांचें मूळ कशांत आहे तें आता स्पष्ट होईल. आपला धर्म फक्त निराळा असें मानून, बाकी सर्व क्षेत्रांत भारतीय जीवनाशी एकरूप व्हावयाचें म्हणजेच भारतीय व्हावयाचें अशी मुस्लिमांची भावना नाही. भारताला मातृभूमि, पितृभूमि मानण्यास ते तयार नाहीत. तसें असतें तर जें जें भारतीय त्याचा त्याचा अभिमान त्यांनी धरला असता.
 संस्कृत भाषा, तिच्यांतील वेदोपनिषदादि विश्ववंद्य ग्रंथ, भारतांतील महापुरुष, येथल्या थोर स्त्रिया, वन्दे मातरम् हें राष्ट्रगीत, येथील अमर महाकाव्यें, हें सर्व त्यांना आपलें वाटलें असतें. इस्लामचा अभिमान बाळगूनहि त्यांनी हिंदु धर्म, हिंदू तत्त्वज्ञान, हिंदु धर्मप्रणेते यांच्याविषयी पाश्चात्त्य ख्रिस्ती पंडितांप्रमाणेच आदरभाव प्रकट केला असता. तुर्कस्थान, इजिप्त, सिरिया, इराक यांनी आपापल्या देशांना मातृभूमि मानून तिच्या सर्व प्राचीन वैभवाकडे याच दृष्टीने पाहिलें आहे. भारतीय मुस्लिमांनी ती दृष्टि स्वीकारली असती, तर येथे हिंदु-मुस्लिम समस्या निर्माणच झाली नसती.
 १९०६ सालीं मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि मुस्लिमांनी आपला सवता सुभा मांडला. तेव्हापासून आजपर्यंत ते सवत्या संसाराचाच आग्रह धरून आहेत. याचें एक कारण असें सांगितलें जातें की, याला काँग्रेसचे हिंदु नेतेच जबाबदार आहेत. कारण त्यांनी काँग्रेसचें हिंदुकरण केलें, आणि मुस्लिमांना सवता सुभा करणें अपरिहार्य करून टाकलें. या आक्षेपाच्या बुडाशीं वरील वृत्तीच आहे, हें थोड्या विचाराअंतीं दिसून येईल. टिळक, गांधी, पटेल व नेहरू हे काँग्रेसचे प्रमुख नेते. त्यांच्यावर काय आणि कसे आक्षेप घेतले जातात तें पाहिलें म्हणजे हिंदूकरणाच्या आरोपामागे कोणती वृत्ति आहे तें कळून येईल.
 अजीज अहंमुद म्हणतात, "टिळक आरंभापासूनच मुस्लिमविरोधक होते. हिंदु परंपरांचें पुनरुज्जीवन हें त्यांनी राजकारणांत आणले. १८९३ च्या मुस्लिम दंग्यानंतर त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर हिंदु समाजाचे संघटन सुरू केलें. नंतर त्यांनी गणेशोत्सव व शिवाजी उत्सव सुरू केले. टिळकांचा हा वारसा १९४७ पर्यंत काँग्रेसमध्ये राहिला होता!" (स्टडीज् इन् इस्लामिक कल्चर, पृष्ठ २६५).