पान:इहवादी शासन.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२६ । इहवादी शासन
 

भारताशीं मुस्लिमांना समरस व्हावयाचें नाही. अनेक शतकें जी विभक्तता त्यांनी जोपासली ती त्यांना अजूनहि तशीच टिकवावयाची आहे. त्यांना केवळ इस्लाम धर्मच टिकवावयाचा आहे असें नाही. त्यांना कायदा निराळा हवा आहे, शिक्षण निराळें हवें आहे, भाषा निराळी हवी आहे आणि स्फूर्तिस्थानें निराळी हवीं आहेत !

पडखाऊ वृत्ति

 मुस्लिम हे अल्पसंख्य आहेत, बहुसंख्याकांनी मोठेपणाने त्यांच्याकडे उदार दृष्टीने पाहवें, ते धाकटे भाऊ आहेत, हिंदूंनी बडे भाई म्हणून पड खाऊन त्यांचे चालवावें, असा उपदेश केला जातो. राष्ट्रीय एकात्मतेची जबाबदारी हिंदूंच्यावर आहे, अशीं भाषणें काँग्रेस नेते करीत असतात. हिंदूंनी तसें करावयाचें ठरविलें तर त्यांना कशांत पड घ्यावी लागेल, कोठे तडजोड करावी लागेल त्याचा विचार करून मगच त्यांनी हीं भाषणें करावीत, अशी माझी विनंती आहे.
 शिक्षणाचें क्षेत्र पाहा. हिंदु देवतांची वर्णनें असलेले लेख पाठ्यपुस्तकांमध्ये येतां कामा नयेत. राम, कृष्ण यांच्या कथांनी मुस्लिम विद्यार्थ्यांची मनें दूषित होतात. तेव्हा त्या कथा वर्ज्य केल्या पाहिजेत. शिवाजी, राणा प्रताप यांची हिंदु लेखक फार स्तुति करतात. भूषण कवीने केलेली शिवप्रशस्ति हा पाठ असला, तर त्या वेळी मुल्लिम विद्यार्थी उठून जातात. तेव्हा असली चरित्रे पाठ्यपुस्तकांत असता कामा नयेत. संस्कृत भाषा अजीबात वर्ज्य मानली पाहिजे. त्रिभाषा सूत्रांत ती असता कामा नये. इतिहासांतून मुस्लिमांविषयीची टीका व हिंदु वीरपुरुषांचा गौरव हीं गाळून टाकली पाहिजेत.
 शालेय पाठ्यपुस्तकांत मुस्लिमांच्या दृष्टीने आक्षेपार्ह वचनें कोणती आहेत त्याचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारने सयद्दीन समिति नेमली होती. तिने पुढील उतारे आक्षेपार्ह ठरविले आहेत- "मोगल सम्राट् अकबर सर्व राष्ट्र पराधीन करण्याचा प्रयत्न करीत आहे हें पाहून महाराणा प्रताप याने प्रतिज्ञा केली की, जोपर्यंत देश आक्रमकांच्या ताब्यांतून मुक्त होत नाही तोपर्यंत मी जंगलांत राहीन, कोणताहि डामडौल करणार नाही." हा उतारा आक्षेपार्ह आहे! रूपनगरच्या राजकन्येने राजसिंहाला पत्र लिहिलें, "उद्या संध्याकाळच्या आंत आपण आला नाही तर मी जिवंत राहणार नाही. दिल्लीश्वर औरंगजेब हा माझ्याशी लग्न करण्यासाठी आला आहे. मला राठोड वंशाला कलंक लावावयाचा नाही." हा उतारा आक्षेपार्ह आहे. बल्बन, कुतुबुद्दीन, अल्तमश यांनी हजारो मंदिरें पाडलीं, लक्षावधि पुरुषांच्या कत्तली केल्या. ही माहिती शालेय पुस्तकांत देणें समितीला आक्षेपार्ह वाटतें.
 बडे भाईचा मान स्वतःकडे घेऊन धाकट्या मुस्लिम भाईचा हट्ट पुरवावयाचा असें हिंदूंनी ठरविलें, तर त्यांना काय काय पथ्ये पाळावी लागतील तें वरील