पान:इहवादी शासन.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२२ । इहवादी शासन
 

शाळा उर्दू शिक्षण देण्यास नकार देतील त्यांचें सरकारी अनुदान बंद करण्यांत यावें. (हाजी अबदुल वहाव- इस्लामी धर्मशिक्षण परिषद्, 'साधना', ३० ऑगस्ट १९६९).
 ● जागतिक मुस्लिम ऐक्याला राष्ट्रवादामुळे सर्वांत जास्त धोका निर्माण झाला आहे. मुस्लिम हे आंतरराष्ट्रीय पक्षाचे असल्यामुळे त्यांना राष्ट्रवाद मान्य करतां येणार नाही. राष्ट्रवाद इस्लामविरोधी आहे. जागतिक मुस्लिम बंधुभाव टाकून राष्ट्रवाद स्वीकारणें हें काफरांचें अनुकरण आहे- एस्. एम्. गुरुफ, मरियम, जमीला. (रेडियन्स, दि. १३- १२- १९६४ व ९–५-१९६५).
 • इहवाद हा नीतिहीन, नास्तिक व म्हणूनच सैतानी होय. त्यावर आधारलेली लोकशाही गुणांपेक्षा संख्येवर भर देते म्हणून ती त्याज्य होय. लोकशाहींत तिच्या जन्मापासून नीतिहीनता आहे- एस्. अबदुल गफार डॉ. इकबालच्या आधारे. (रेडियन्स, दि. २८ -११-१९६५ व २-१-१९६६).
 • सर्व धर्म सारखेच सत्य व कल्याणकारक आहेत ही कल्पना भ्रांत आहे. एका उद्दिष्टाकडे जाणारे ते भिन्न मार्ग आहेत, हें सत्य नाही. (ए. एफ्. बादशहा हुसेन शरीयत-उल्-इस्लाम).
 • राष्ट्रवाद अंगीकारणारा मुस्लिम मनुष्य स्वतःच्या देशांतील प्राचीन परंपरांचा अभिमान बाळगू लागतो, तेथील पवित्र स्थळें पूज्य मानतो, देशभाषेचा अभिमान धरतो. महंमद पैगंबर व त्यांचे सहकारी यांच्यापासून स्फूर्ति न घेतां तद्देशीय वीर पुरुषांपासून तीं घेतो. स्वदेशाबाहेरील भाषा, तीर्थे, पुरुष यांना तो स्वकीय मानीत नाही. म्हणजे त्याच्या मनांत राष्ट्रवाद एका दिशेने शिरतांच इस्लाम दुसऱ्या दिशेने निघून जातो. (नॅशनॅलिझम अँड इंडिया- मौ. मौदुदी). (साधना, पुणे व 'इस्लाम इन् इंडियाज् ट्रँझिशन टु मॉडर्निटी- करंदीकर. यांत 'रेडियन्स,' 'निदाए मिल्लत' इत्यादि मुस्लिम पत्रांतून हे उतारे दिलेले आहेत. तेथूनच ते येथे घेतलेले आहेत.)

जिहादचा आग्रह

 मुस्लिम नेत्यांचे वरील उद्गार व त्यांतून दिसणारी त्यांची वृत्ति पाहिली, तर हिंदु-मुस्लिम समस्येचा विचार करणाऱ्यांच्या हें ध्यानांत येईल की, आहे या स्थितीत त्या समस्येवर तोड निघणें अशक्य आहे. हिंदूंना, भारतीय घटनेला व भारत सरकारला जें जें तत्त्व हवें आहे तें मुस्लिमांना विषवत् त्याज्य आहे. त्यांना इहवाद नको आहे, राष्ट्रवाद नको आहे, लोकसत्ता नको आहे, धर्मसमानत्व नको आहे! भारतीय परंपरेचा अभिमान धरणें, मानवकृत कायदा मानणें हें त्यांना इस्लामविरोधी वाटतें. संस्कृत भाषेचा त्याना द्वेष वाटतो. राम, कृष्ण, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, शिवाजी, राणाप्रताप, महात्माजी, नेहरू यांच्यापासून स्फूर्ति