पान:इहवादी शासन.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २२१
 



 भारतांतील मुस्लिम जमात ही इहवादविरोधी शक्ति भारताच्या राष्ट्र- संघटनेला, लोकशाहीला व एकंदर प्रगतीला अनुकूल कशी करून घेता येईल याचा विचार आपण करीत आहों. त्यासाठीच त्या शक्तीचें स्वरूप काय आहे हें आपण प्रथम पाहिलें व नंतर तिला वश करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने कोणते प्रयत्न केले व त्यांचें फल काय मिळाले याचा विचार केला. काँग्रेसचे सर्व प्रयत्न फसले, इतकेंच नव्हे, तर तिने मुस्लिम- अनुनयाची जी विषम व पक्षपाती नीति अवलंबिली तिच्यामुळे हिंदु-मुस्लिम ऐक्य अशक्य होऊन बसलें आहे, असें आपल्या ध्यानांत आलें. म्हणुन आता भारतीय जनतेने या दृष्टीने उपाययोजना काय करावी याची चर्चा करावयाची आहे.
 ती करण्यापूर्वी मुस्लिम जमातीचें स्वरूप पाहतांना तिचें तत्त्वज्ञान, तिच्या आकांक्षा, वृत्ति, हिंदूंकडे, इतर धर्मीयांकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन यांविषयी येथवर ज्या ठळक गोष्टी ध्यानांत आल्या त्या थोडक्यांत पुन्हा एकदा भांडतों म्हणजे चर्चा सुलभ होईल.
 • हिंदुस्थानांत हिंदु-मुस्लिम ऐक्य अशक्य असून, येथे दोघांपैकी एकच कोणी तरी सत्ताधारी होऊं शकेल. तेव्हा मुस्लिमांनी सर्व भारत पुन्हा जिंकणें हा एकच उपाय आहे. (खान- दुराणी- मीनिंग ऑफ पाकिस्तान).
 • भारत जिंकल्यावर जिहाद पुकारून सर्व हिंदूंना इस्लामची दीक्षा देऊन येथे अरबी खलिफांप्रमाणे इस्लामी शासन स्थापन केलें पाहिजे. (अबुल हसन नदवी- इस्लाम अँड दि वर्ल्ड). जो असा जिहाद पुकारील तोच खरा मुस्लिम.
 • हुकमत इ इलाहिया- अल्लाची सत्ता; त्याच्या कायद्याचें राज्य प्रस्थापित करणें हें जमाते इस्लामीचें उद्दिष्ट आहे. (रेडियन्स, दि. १३ -६-१९६५).
 • मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करणें हें आम्ही केव्हाही सहन करणार नाही. तसें करणारांना आमच्या प्रेतांवरून अंमलबजावणी करावी लागेल. (निदाये मिल्लत, दि. ९-२-१९६९).
 • हिंदुस्थानचा मुसलमान बाहेरच्या इस्लामी दुनियेपासून वेगळा राहूं शकत नाही हें पॅलेस्टाईन दिनाच्या सभा- मिरवणुकांवरून सिद्ध झालें. हिंदुस्थानी मुसलमानांनी हिंदुस्थानच्या सरहद्दीपुरतेच मर्यादित राहिलें पाहिजे हें आम्हांला मान्य नाही- मौ. अबुल हसन नदवी (निदाये भिल्लत, दि. ९-११-१९६९).
 • मुसलमान मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था संपूर्णपणें मुसलमानांकडेच सोपविण्यांत यावी. माध्यमिक पातळीवर उर्दू भाषा शिक्षणाचें माध्यम करावें. हिंदी पुस्तकांत संस्कृतला स्थान असूं नये. त्रिभाषा सूत्रांतून संस्कृत वगळण्यांत यावें. ज्या