पान:इहवादी शासन.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २१९
 

 अलअक्सा मशीद जाळली गेली तेव्हा मुस्लिमांबरोबर भारत सरकारहि संतापले. पण पूर्व जेरुसलेममध्ये अनेक ज्यू मंदिरें, पस्तीस पैकी चौतीस सिनॅगॉग पाडण्यांत आली त्या वेळीं भारत सरकार स्वस्थ होतें. ऱ्होडेशियामध्ये चोवीस आफ्रिकनांना फाशी देण्यांत आलें. त्या वेळीं भारत सरकारने मानवतावादाचा उचंबळा आल्यामुळे आकाशपाताळ एक केलें. पण इराकमध्ये नऊ ज्यूंना फाशी देण्यांत आलें तेव्हा त्याने ब्रहि काढला नाही. कारण इराक मुस्लिम देश आहे. मानवता, इहवाद, न्याय हें सर्व त्यापुढे रद्द आहे.

औरंगजेबाचा जयजयकार

 हैदराबादचे मुस्लिम मोठमोठ्या सभा भरवून कासीम रझवीचा गौरव करतात. मालेगावच्या मुस्मिमांनी औरंगजेबाचा परवा जयजयकार केला आणि मौ. मौदुदींचा सर्व हिंदी मुस्लिम गौरव करतात. "हिंदूंनी मुस्लिम व्हावें किंवा मरण पत्करावें असें मौदुदींचें मत आहे. त्यांचेच शिष्य मौ. मदनी होत. असे असूनहि अनेक पुरोगामी मुस्लिमहि त्यांचा गौरव करतात. (महाराष्ट्र टाईम्स, दि. २४-११- १९६८). लोकसभेंत हिंदूंच्यावर संतापाने टीका करतांना काँग्रेस नेत्यांनी याची कधी दखल घेतली आहे काय ? का त्यांनाहि रझवी, औरंगजेब, मौदुदी यांचें तत्त्वज्ञान मान्य आहे ?
 'इंडियन सेक्युलर फोरम'ची स्थापना झाली तेव्हा महामंत्री इंदिरा गांधी, गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शुभ संदेश पाठविले होते. त्यांत इहवाद हाच खरा आपल्या लोकशाहीचा व राष्ट्रीयतेचा पाया आहे, असें इंदिरा गांधींनी म्हटलें आहे व अंध शब्दप्रामाण्य नष्ट करण्यास फोरमचा उपयोग होईल, असें चव्हाणांनी म्हटलें आहे. याच प्रसंगीं जयप्रकाश नारायण यांनीहि संदेश धाडला होता. त्यांत त्यांनी म्हटलें आहे की, "आज जात्यंधता व शब्दप्रामाण्य यांची अशिक्षितांतच नव्हे, तर सुशिक्षितांतहि वाढ होत आहे. वास्तविक राजकीय पक्षांनी लोकशिक्षणाच्या मार्गाने याचा बीमोड करणें अवश्य होतें. पण इहवादी राजकीय पक्षांनी, मतें गमावण्याच्या भीतीने किंवा आर्थिक कारणांच्या भ्रांत महत्त्वामुळे ती जबाबदारी टाळली आहे."
 हा आरोप काँग्रेस नेत्यांना मान्य नसेल व त्यांना खरोखरच लोकशिक्षणाच्या मार्गाने इहवाद, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा यांची तत्त्वें लोकांत रुजवावयाची असतील तर त्यांनी एक गोष्ट करावी. १९३७-३८ साली संकल्पिलेला मुस्लिम जनतासंपर्क आता सुरू करावा. समान नागरी कायद्यासाठी मुस्लिमांत पूर्वतयारी करावयास हवी, असें त्यांना खरोखरच वाटत असेल, तर लोकशिक्षणाचें हें कार्य त्यांनी हातीं घ्यावें. समान नागरी कायदा ही गोष्ट अशी आहे की, त्यासाठी तयारी करावयाची म्हणजे इहवादाचीं सर्व तत्त्वें समाजाच्या मनांत दृढमूल करावी लागतात. सेक्युलर फोरमने स्थापनेच्या वेळीं जे ठराव केले आहेत त्यांचा आशय हाच आहे. अध्यक्ष जी. डी. पारीख यांनी आपल्या भाषणांत तीं सर्वमान्य तत्त्वेंच सांगितलीं आहेत. धर्म