पान:इहवादी शासन.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २१५
 

गामी, जीर्ण, जात्यंध अशा मुस्लिम संस्थांशी व व्यक्तींशीं ते सहकार्य करीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरहि मुस्लिम लीगशी काँग्रेस सहकार्य करीत राहिली याचा दुसरा कोणता अर्थ आहे ?

लीगशी हातमिळवणी

 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुस्लिमांच्या वृत्तींत जसा काडीमात्र फरक पडला नाही तसाच पंडितजींच्या व काँग्रेसच्या मुस्लिम- प्रेमांतहि फरक पडला नाही. ज्या लीगने फाळणी घडवून आणली, ज्या लीगने 'डायरेक्ट ॲक्शन'चा अवलंब करून विध्वंस, जाळपोळ, अत्याचार करून हजारो हिंदूंच्या कत्तली केल्या, त्या लीगवर काँग्रेस स्वातंत्र्यानंतरहि एकनिष्ठ प्रेम करीत राहिली. १९५२ साली आसाममध्ये चाळीस लक्ष मतदारांपैकी आठ लक्ष मुस्लिम होते. अर्थात् निवडणूक लढवा- जिंकावयाची तर लीगवाल्या मुस्लिमांना तिकिटे देणें अवश्यच होतें. सय्यद सादुल्ला या मुस्लिमाला काँग्रेसने सभासद करून घेतलें. त्याने वीस जागा मुस्लिमांसाठी मागितल्या. काँग्रेसने त्या दिल्या नाहीत. त्यामुळे त्याने काँग्रेस सोडली. तरी काँग्रेसने लीगवादी मुस्लिमांना चौदा तिकिटें दिलींच. केरळमध्ये काँग्रेसने मुस्लिम लीगशी सहकार्य केलें. आसाम व केरळ हे सरहद्दीचे प्रांत. तेथे तरी काँग्रेसने लीग-संबंधांत जपणूक करणें अवश्य होतें. पण देशहिताची ज्यांना चिंता असते त्यांच्या या गोष्टी. जे निवडणूक व सत्ता हेंच अंतिम उद्दिष्ट मानतात त्यांच्या नव्हे!
 १९६१ सालीं काँग्रेसचे अध्यक्ष संजीव रेड्डी यांनी लीग-दोस्तीचें जोरदार समर्थनच केलें आणि त्याच वेळीं, यामुळे काँग्रेस जातीय ठरत नाही, असाहि त्यांनी निर्वाळा दिला. लक्ष्मीमेनन, काँग्रेसचे माजी अध्यक्ष ढेबरभाई यांनी काँग्रेस जातीय- वादाला कवटाळीत आहे, अशी टीका केली. पण तें अरण्यरुदन ठरलें आणि लीगवर इतकें अनन्य प्रेम करून मिळालें काय ? लीगचे अध्यक्ष महंमद इस्माईल म्हणाले, "अल्पसंख्याकांच्या दुःखाला नेहरूच जबाबदार आहेत."
 लीगवरच नव्हे तर काँग्रेसचें व पंडितजींचें पाकिस्तानवरहि स्वातंत्र्यानंतर प्रेम कायम होतें. पाकिस्तानवर टीका केली, तर पंडितजींना राग येत असे. ३० ऑक्टोवर १९६० रोजी शुक्लनगर येथील भाषणांत ते म्हणाले, "पाकिस्तानविषयी प्रखर भाषण करून काय होणार ? आपले पूर्वीचे स्नेहसंबंध आहेत, स्वातंत्र्ययुद्धांत आपण खांद्याला खांदा लावून लढलों होतों, हें विसरूं नका." यामुळेच पाकिस्तानांतून भारतांत लक्षावधि लोक चोरून घुसत याची पंडितजींना मुळीच काळजी वाटत नसे. १९५० सालीं काचारमध्ये दंगल झाली. त्या वेळीं चौकशी समितीने "काचारमधील मुस्लिमांवर लीगचें वर्चस्व आहे," "आम्ही जगज्जेते मुसलमान, काचारचें करणार पाकिस्तान" अशी गाणीं तेथे गातात, असें स्पष्ट सांगितलें. तेथील मंत्री मोइनुलहक्क चौधरी व दुसरे एक लीगवादी मंत्री हे काचार पाकि-