पान:इहवादी शासन.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २१३
 

पूर्ण पराभव झाला असतांनाहि त्याची जिंदगी खालसा न करतां त्याला सर्व इतमामासह सांभाळण्यांत आलें! (दि इंडियन ट्रिमुव्हरेट- व्ही. बी. कुलकर्णी, पृष्ठ ४३१).
 काश्मीरच्या राजाने आपले संस्थान भारतांत सामील करण्याचें मान्य केलें. साहजिकच त्याची पुढची व्यवस्था सरदार पटेलांच्या हाती आली. अर्थातच इतर संस्थानांप्रमाणे तेंहि विलीन झालें असतें. पण शेख अब्दुल्लांच्या सांगण्यावरून पंडितजींनी काश्मीर संस्थान सरदारांच्या अखत्यारीतून काढून घेतलें. पुढे काय झालें हे सर्वश्रुतच आहे. डॉ. के. एम. मुन्शी म्हणतात, शेखांच्या सल्ल्यावरून नेहरूंनी काश्मीर असें सरदारांकडून काढून घेतलें नसतें, तर काश्मीरची समस्या उद्भवली नसती " (वरील ग्रंथ, पृष्ठ ३९३). पंडितजींच्या मुस्लिमप्रेमामुळे भारताच्या हिताची केवढी हानि झाली आहे तें यावरून स्पष्ट दिसून येईल.
 त्यांची हीच जातीय वृत्ति अखेरपर्यंत कायम होती. त्यानंतर त्यांच्या वारसांनी अनन्यनिष्ठेने तिचाच परिपोष चालविला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळांत हिंदु-मुस्लिमांच्य ऐक्याच्या नावाखाली मुस्लिम जातीय वृत्तीची काँग्रेसने जोपासना केली. स्वातंत्र्यानंतर सत्तेसाठी तेंच व्रत तिने पुढे चालविलें. पण तत्पूर्वी हिंदु-मुस्लिम ऐक्य हे, जें उद्दिष्ट काँग्रेसच्या नेत्यांनी डोळ्यांपुढे ठेविलें होतें त्याचा विचार करूं.
 महात्माजी व पंडितजी या दोन थोर पुरुषांनी हिंदुस्थानांत राष्ट्रीय वृत्तीचें संवर्धन व्हावें म्हणून सर्व जन्मभर प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी वाटेल त्या यातना सोसल्या, असीम त्याग केला. हिंदु-मुस्लिम ऐक्य हा त्यांच्या त्या प्रयत्नांचाच भाग होता. पण त्या दृष्टीने पाहिलें तर असें दिसतें की, इतर प्रत्येक क्षेत्रांत त्यांनी जें पुरोगामी, तर्कशद्ध, बुद्धिवादी व इहवादी धोरण अंगीकारलें होतें त्याचा मुस्लिमांच्या बाबतींत त्यांनी जाणूनबुजून त्याग केला होता. राष्ट्रसंवर्धनाच्या आड मुस्लिमांची कोणतीं तत्त्वें येत होतीं ? विश्व-मुस्लिमवाद, कुराणाविषयीचें व उलेमाविषयींचें अंधप्रामाण्य, धर्माची अपरिवर्तनीयता, धर्मसमतेला विरोध, अल्लाचाच कायदा आम्ही मानूं, मानवाने केलेला कायदा मानणार नाही हा आग्रह, यांतून निर्माण होणारा लोकशाहीचा द्वेष, हीं तीं तत्त्वें होतीं.
 या तत्त्वांचा आग्रह मुस्लिम समाजाने सोडल्यावांचून हिंदी राष्ट्राचे संवर्धन होणें कधीहि शक्य नव्हतें व अजूनहि नाही. महात्माजी व पंडितजी यांनी वरील तत्त्वें मुस्लिमांनी त्यागिली पाहिजेत असा प्रचार मुस्लिम समाजांत जाऊन केला काय? बुद्धीला न पटणारी वचनें धर्मग्रंथांत असली तरी मी मानणार नाही, असें महात्माजी म्हणत. त्यांनी हा विचार मुस्लिम समाजांत प्रसृत करण्यासाठी लेख लिहिले काय? स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समता यांचे महात्माजी कडवे पुरस्कर्ते होते. आपल्या मुस्लिम बांधवांच्यावर या दृष्टीने त्यांनी कधी टीका केली काय? ज्या मुस्लिमांनी वरील सर्व राष्ट्रविरोधी तत्त्वांचें समर्थन केलें त्यांना त्यांनी काँग्रेसप्रवेश नाकारला काय?