पान:इहवादी शासन.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१२ । इहवादी शासन
 

 पण तीच त्यांची वृत्ति होती. हिंदूंची देवळें पाडून तेथे मशिदी बांधल्या, तरी त्याला हरकत नाही पण मशीद पाडणें हा मात्र भयंकर गुन्हा आहे, हें सुभेदार अलीनकीखान यांचें मत मागे एके ठिकाणी दिले आहे. हीच काँग्रसची, महात्माजींची व पंडितजींची वृत्ति होती. मुस्लिमांचा प्रश्न आला की महात्माजी सत्य, अहिंसा, मानवता, समन्याय हीं आपली प्रिय तत्त्वें वाऱ्यावर उधळून देत. शिवाजी व राणा प्रताप यांना त्यांनी 'वाट चुकलेले देशभक्त' असें अगदी सहज बदनाम केलें. पण लक्षावधि हिंदूंच्या कत्तली करणारे तयमूर, फिरोज तघ्लख, अल्लाउद्दीन, औरंगजेब यांसारख्या मुस्लिम सुलतानांवर त्यांनी चकून सुद्धा कधी टीका केली नाही.
 अब्दुल रशीदसारखे अनेक मुस्लिम खुनी पुढे निघाले. मुस्लिमांनी त्यांचा हुतात्मे म्हणून गौरव केला. पण महात्माजींनी या खुनी इसमाचा कधीहि निषेध केला नाही किंवा त्यांचा गौरव करणाऱ्या मुस्लिमांना कधी जाब विचारला नाही. कलकत्त्याला मुस्लिमांनी हिंदूंवर भयंकर अत्याचार केले, कत्तली केल्या. त्यांचा सूड म्हणून बिहार व उत्तर प्रदेश येथील हिंदूंनी तेथील मुस्लिमांच्या कत्तली केल्या. त्या वेळी "इतर प्रांतांतील मुस्लिम सुसंस्कृतपणें वागावयास हवे असतील, तर हिंदूंनी बिनशर्त माफी मागावी", असा महात्माजींनी उपदेश केला व सर्व हिंदूंना संदेश दिला की, "संपूर्ण आत्मनाशाचा धोका पत्करूनहि, हिंदूंनी औदार्याचें असें उदाहरण घालून द्यावें!" (दि इंडियन ट्रिमुव्हरेट- व्ही. वी. कुलकर्णी, पृष्ठ ३८८). अशा तऱ्हेचा उपदेश त्यांनी चुकून सुद्धा मुस्लिमांना कधी केला नाही. तेव्हा हिंदु व मुस्लिम यांना भिन्न न्याय लावले पाहिजेत अशीच त्यांची वृत्ति होती हे उघड आहे.
 पंडित नेहरू यांनी जन्मभर याच विषम नीतीचा, याच जातीय वृत्तीचा पुरस्कार केला. वरील प्रसंगी बिहारच्या हिंदूंना "तुमच्यावर मी बाँबवर्षाव करीन अशी धमकी त्यांनी दिली. सबंध जन्मांत पंडितजींनी मुस्लिमांना अशी धमकी कधी दिली नाही. त्या वेळी राजसत्ता नुकतीच त्यांच्या हाती आली होती. तिची पहिली सलामी हिंदूंना अशी मिळाली! अफजलखान- शिवाजी प्रकरणांत, शिवाजीने कपटाने खानाला मारलें म्हणून महाराजांच्यावर ठपका ठेवून ते मोकळे झाले. पण नित्य कपट-विद्येचा आश्रय करणाऱ्या खानाला किंवा इतर मुस्लिमांना त्यांनी दूषण दिले नाही.
 सरदार पटेलांच्या प्रेरणेने भारतांतील सर्व संस्थाने भारतांत विलीन झाली. हैदरावादच्या निजामाने नकार देऊन हिंदूंच्यावर रझाकारी अत्याचार केले. असें असूनहि निजामाने रझाकारी अत्याचार तीन महिन्यांच्या आंत थांबवावे, एवढ्याच अटीवर त्याचें संस्थान जवळ जवळ सार्वभौम सत्तेवर ठेवण्याचें भारत सरकारने मान्य केलें होतें. त्याची स्वतंत्र सेना ठेवण्यासहि मान्यता दिली होती! निजामाने हेंहि मान्य केलें नाही तेव्हा त्याच्यावर स्वारी करण्यांत आली आणि त्या लढ्यांत त्याचा