पान:इहवादी शासन.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०० । इहवादी शासन
 

शरीयतवर श्रद्धा नाही. ते केमालप्रमाणे पाकिस्तानमध्ये इहवादी शासन स्थापतील. तेव्हा पाकिस्तानमुळे इस्लामची गति कुंठितच होणार असल्यामुळे त्या मागणीला पाठिंबा देणें योग्य नाही. (दि देवबंद स्कूल ॲण्ड डिमांड फॉर पाकिस्तान, झिया उल हसन फरूकी, पु. ११४- १२१) देवबंदपंथीय राष्ट्रीय मुस्लिमांचा पाकिस्तानला विरोध होता तो या कारणामुळे होय.
 खिलाफत चळवळीच्या प्रारंभापासून भारतांत राष्ट्रीय मुसलमान नांवाचा जो वर्ग निर्माण झाला आहे त्याचे स्वरूप काय आहे तें यावरून कळेल. स्वातंत्र्यचळवळीला त्याचा विरोध होता. जातीय निवाड्याचें त्यांनी स्वागत केलें होतें. अफगाणिस्तानच्या अमिराची स्वारी त्यांना हवी होती. हिंदूंवर घोर अत्याचार झाले, तरी त्यांचा ते निषेध करीत नाहीत. तसे अत्याचार करणाऱ्यांना देहान्त शासन झाले, तर ते त्यांना हुतात्मा मानून त्यांचा गौरव करतात. राष्ट्रीय म्हणून नांवलौकिक झालेल्या मुस्लिमांची ही मनोवृत्ति ! मग मुल्ला-मौलवींच्या वर्चस्वाखाली असलेल्या एकंदर समाजाची काय मनोवृत्ति असेल ?
 अलीकडे काही मुस्लिमांनी अत्याचार केले म्हणून सर्व मुस्लिम समाज तसाच आहे असें समजणें हा अन्याय आहे, असें सांगितलें जातें. तसें शक्य आहे. पण तसा नसलेला हा समाज, मुल्ला-मौलवींच्या चिथावणीमुळे एका क्षणांत तसा होतो, हें बंगालच्या फाळणीच्या वेळीं, मोपला अत्याचाराच्या वेळी, कोहटच्या दंग्याच्या वेळी, पाकिस्तानच्या निर्णयाच्या वेळीं व त्यानंतर प्रत्येक दंग्याच्या वेळी दिसून आलें आहे, येत आहे, प्रत्येक वेळी कृतीने व वाणीने मुस्लिम समाज सांगत आहे, आम्हांला भारतीय जीवनाशी एकरूप व्हावयाचें नाही ! "


 एकोणिसशे चौसष्ट सालीं मुस्लिम मजलिस मुशावरतची स्थापना झाली. हिंदु- मुस्लिम जमातींत सहकार्य घडवून आणावें, विशेषत: जातीय दंगलींना आळा घालावा हें तिचें उद्दिष्ट होतें. हिंदू व मुस्लिम या दोन्ही जमातींच्या पुढाऱ्यांनी एकत्र संयुक्त दौरा काढून सर्व देशभर फिरावें व दोन्ही जमातींच्या लोकांना, "आजपर्यंतचे हेवेदावे विसरून राष्ट्रपिता महात्मा गांधींचे वारस या नात्याने राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी आपल्या देशबांधवांशीं बंधुत्वाच्या नात्याने वागावें व पंडित नेहरूंच्या स्मृतीचा आदर करावा, असे आवाहन करावें" असें एक पत्रक १४ सप्टेंबर १९६४ रोजीं मजलिसच्या नेत्यांनी काढलें. त्यावर डॉ. सय्यद महमूद, मौ. आझाद, मदनी 'रेडियन्स'चे मॅनेजिंग डायरेक्टर युसुफ सिद्दिकी आदि लोकांच्या सह्या होत्या.
 जमाते इस्लामी ही संस्था १९४१ सालीं मौ. मौदुदी यांनी स्थापन केली होती. मौदुदी हे कडवे जमातवादी असून त्यांची संस्था मुस्लिम जमातवादाच्या पोषणासाठीच