पान:इहवादी शासन.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६ । इहवादी शासन
 

खून केला. त्या वेळीं देवबंद पीठाने व सर्व मुस्लिमांनी त्याचा हृतात्मा म्हणून गौरव केला.
 १८५५ सालीं अयोध्येच्या हनुमानगढीवरून हिंदु-मुस्लिमांत संघर्ष निर्माण झालेला होता. तेथे पूर्वी मशीद होती असा मुस्लिमांचा दावा होता. दिल्लीचा बादशहा व इंग्रज रेसिडेंट यांनी चौकशी करून दावा खोटा आहे असा निर्णय दिला, तरी मुस्लिम दंगली थांबविनात. तेव्हा रेसिडेंटने सुभेदार अलीनकीखान याला लिहिले होते की, या प्रांती तुमचें राज्य अनेक वर्ष आहे. इतके दिवस तुम्ही गप्प बसलात. तेव्हा मशीद असली तरी आता वाद उकरून काढणें योग्य नव्हे. कारण पूर्वी देवळें पाडून मशिदी बांधल्या आहेत तेथे मशिदी पाडुन पुन्हा देवळे बांधून द्या असें हिंदु म्हणतील त्याचें काय ?
 यावर अलीनकीखानाने उत्तर दिलें तें मुस्लिम मनोवृत्तीचे द्योतक आहे. तो म्हणाला, "तुम्ही हीं दोन्ही प्रकरणें सारखी मानतां ही आश्चर्याची गोष्ट आहे. हिंदु हे नेहमी मुस्लिमांच्या अंकित राहिलेले आहेत. त्यांची देवळे पाडून तेथे मशिदी उभारल्या तर त्याला कसली हरकत? मशीद पाडणे हा मात्र भयंकर गुन्हा आहे. त्याला मृत्यूचीच शिक्षा दिली पाहिजे." ('ही रामाची अयोध्या'- सेतुमाधवराव पगडी, लोकसत्ता दिवाळी अंक १९६९, पृष्ठ १५१) अर्थात् इंग्रजांनी हा दावा मान्य केला नाही हे निराळे. पण हिंदु समाजाकडे पाहण्याचा मुस्लिमांचा दृष्टिकोन यावरून स्पष्ट दिसतो. "आम्ही हिंदूंची देवळें पाडणार. त्यांनी मशिदी पाडता कामा नये. आम्ही हिंदूंना बाटविणार. त्यांनी शुद्धि करणें हें राष्ट्रद्रोही कृत्य होय."

राष्ट्रवादाचा अपमान

 मुल्ला-मौलवींच्या इस्लामचें एक तत्त्व असें आहे की, जो मुस्लिम नाही असा मनुष्य कितीहि श्रेष्ठ असला तरी हीन मुस्लिमांपेक्षाहि तो हीन होय. १९२४ साली महंमद अल्ली व इतर राष्ट्रीय मुस्लिम गांधींना महात्मा म्हणत असत. इस्लामच्या धुरीणांना याचा संताप आला व त्यांनी महंमदअल्लींवर गहजब केला. तेव्हा त्यांनी जाहीर केलें की, अत्यंत हीन, पतित, व्यभिचारी असा मुस्लिमहि मला श्री. गांधीपेक्षा श्रेष्ठ वाटतो. हा महात्माजींचा तर अपमान होताच पण भारताचा आणि त्याच्या राष्ट्रवादाचाहि अपमान होता. तरी खरे, नरीमन, सुभाषचंद्र यांना काँग्रेस मधून हाकलून देण्याचें जसें काँग्रेसने धोरण ठरविलें तसें महंमदअल्लींच्या बाबतींत ठरविलें नाही. त्यांना अखेरपर्यंत राष्ट्रीय मुस्लिम म्हणून काँग्रेसने गौरविलें.
 डॉ. किश्चलू हे दुसरे राष्ट्रीय मुसलमान ! शुद्धीच्या चळवळीमुळे ते भडकले व म्हणाले, "हिंदु नामर्द आहेत. आम्ही मुस्लिम राष्ट्रीय चळवळींत पडलों म्हणून तिला कांही चैतन्य आलें, हें हिंदूंनी ध्यानांत घ्यावें. आमच्या तैजीम, तबलीघसारख्या