पान:इहवादी शासन.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १९५
 

खिलाफत चळवळ सुरू झाल्यानंतर पुढील आठ-दहा वर्षांत ज्या घटना घडल्या त्या सर्व मुस्लिमांच्या याच वृत्तीची साक्ष देतील. १९२१ सालीं अफगाणिस्थानचा अमीर भारतावर आक्रमण करून येणार अशी अफवा उठली होती. त्याने या आधी एक दोनदा भारतांत सैन्य घुसविलेंहि होतें; यामुळे त्या अफवेला अर्थ होता. त्या वेळीं महंमदअल्ली यांनी जाहीर केलें की, "अफगाण सैन्य जिहाद पुकारून आले तर हिंदी मुस्लिम त्याला जाऊन मिळतील. अमीर हा कांही भारताच्या स्वातंत्र्यासाठी येत नव्हता. आधीच्या प्रसंगीं सैन्य घुसवितांना, गझनीच्या महंमदाप्रमाणे आपण काफिरांचा नाश करून अमाप लूट आणूं" असें त्याने सैन्याला प्रोत्साहन दिलें होतें. (स्ट्रगल फॉर फ्रीडम मुजुमदार, पृष्ठ ८१०- १३). तरीहि महंमदअल्ली त्याला मिळणार होते. कारण काफिरांचा नाश त्यांनाहि अभिप्रेत होता.
 १९२४ सालीं केमालपाशाने खलिफा- पीठच नष्ट करून टाकलें. त्याबरोबर हिंदी मुस्लिम हे स्वराज्याच्या चळवळींतून एकदम बाजूला झाले. तेव्हा त्या चळवळींत ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी सामील झाले नसून पॅन् इस्लामिझम् ही त्याच्यामागे प्रेरणा होती हे पुन्हा एकदा सिद्ध झालें. वास्तविक हे सिद्ध होण्याची गरजच नव्हती. कारण मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी आपले हेतु केव्हाहि लपवून ठेवलेले नव्हते. लेखांतून, भाषणांतून त्यांनी ते अनेक वेळा स्पष्ट केले होते.

पुढील अनर्थाचा पाया

 या खिलाफतीच्या चळवळीचें फलित काय, हें पाहिलें तर असें दिसतें की, हिंदु-मुस्लिम ऐक्य तर तिने साधलें नाहीच, तर उलट इहवादाचे, लोकशाहीचे, राष्ट्रनिष्ठेचे कडवे विरोधी असे, देवबंद पीठाचे व याच वेळीं स्थापन झालेल्या जमियत उल् उलेमा या संस्थेचे जे मुस्लिम नेते, त्यांचें वर्चस्व मुस्लिम समाजावर प्रस्थापित झालें आणि पुढील सर्व अनर्थाचा पाया घातला गेला.
 १९२६ सालीं आर्य समाजाचे एक प्रमुख कार्यकर्ते स्वामी श्रद्धानंद यांचा अब्दुल रशीद या मुस्लिमाने खून केला. याचे कारण म्हणजे आर्य समाजातर्फे स्वामीजींनी चालविलेली शुद्धीची चळवळ. मुस्लिम भारतांत आल्यापासून 'कुराण वा मरण' अशी गर्जना करून लाखो हिंदूंना सक्तीने बाटवीत. प्राचीन काळीं अशा पतितांना त्या वेळचे धर्मधुरीण शुद्ध करून स्वधर्मांत परत घेत. ही हितावह प्रथा पुढे बंद पडली. आर्य समाजाने गेल्या शतकांत तिचें पुनरुज्जीवन केलें. स्वामी श्रद्धानंद यांनी या सुमारास तीन-चार लाख मुस्लिमांना, रजपुतांना शुद्ध करून परत स्वधर्मांत घेतले. यामुळे मुस्लिम समाज भडकून गेला. शुद्धीच्या चळवळीला प्रथमपासूनच मुस्लिम नेते शिव्याशाप देत होते. हे लोक देशघातकी आहेत, राष्ट्रद्रोही आहेत, अशी लाखोली ते वाहत असत. यामुळेच चिथावणी मिळून रशीद याने स्वामींचा