पान:इहवादी शासन.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १८९
 

नजीक आल्या होत्या, त्यांच्यांतील भेदाच्या, विभक्ततेच्या, वैराच्या वृत्ति लोपल्या होत्या असें मात्र मुळीच म्हणतां येत नाही. तशा त्या लोपल्या असत्याहि. पण सरहिंदी, वहाबी, वलीउल्ला व एकंदर मुल्ला-मौलवी यांनी त्या हेतुपूर्वक जिवंत ठेवल्या होत्या आणि बहुसंख्य मुस्लिम समाज त्यांचाच अनुयायी असल्यामुळे या दोन जमातींची एकात्मता अशक्य होऊन बसली.
 अकबर, दाराशिकोह यांनी एकात्मतेचे विपुल प्रयत्न केले होते. मुस्लिम जनतेंत कायमचा द्वेषभाव नसता, तर ते त्याच वेळीं विजयी झाले असते. पण अकबराच्या उदार विचारांचा पुढील काळांत मुल्ला-मौलवींनी ठावठिकाणाहि पुसून टाकला व औरंगजेबाने दाराला ठार मारले तेव्हा त्यांनी त्याला धन्यवाद दिले. आज अकबराचा गुणगौरव केला जातो, पण तो कोण करतो ? फक्त हिंदु त्याचा गौरव करतात ! देवबंद पीठ त्याला मूर्ख, कमअस्सल व व्यवहारशून्य म्हणतें आणि अकबरासारखे विचार राष्ट्रपति झकीर हुसेन यांनी मांडले म्हणून त्यांचीहि त्याने तशीच संभावना केली आहे. (केसरी, दि. १७-२-१९६९, देशपांडे).

भ्रान्त मीमांसा

 १०१८ सालींच पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला गेला असें हॉडसन म्हणतात तें अगदी खरें आहे. तें अपरिहार्य होतें असें मात्र नाही. मुस्लिम समाजधुरीणांनी भारताला मातृभूमि मानली असती तर, तें टळलें असतें. पण येथे राहवयाचें पण भारतीय व्हावयाचे नाही, असें त्यांचें तत्त्व होतें व तें त्यांनी अखिल मुस्लिमांत रुजविलें होतें. त्यांतहि हिंदुसमाज संघटित, इहवादी व त्यामुळे बलशाली असता तरीहि हा अनर्थ टळला असता. अजूनहि तो तसा झाला तर भावी अनर्थ टळतील. पण त्यासाठी मुस्लिमांची शतकानुशतकांची वृत्ति काय आहे, त्यांचें तत्त्वज्ञान काय आहे हें त्याने जाणलें पाहिजे व केवळ इंग्रजांच्या भेदनीतीमुळे हें झालें, पूर्वकाळीं हे दोन समाज एकात्म झाले होते, अशा भ्रांत मीमांसांच्या आहारीं जातां कामा नये. गेल्या दीडशे वर्षांत भारताचा धर्म, राजकारण, समाजजीवन, कला, साहित्य यांवर ब्रिटिशांच्या धर्म, कला, साहित्याचा थोडा का परिणाम झाला आहे ? प्रत्येक क्षेत्रांत ब्रिटिश तत्त्वज्ञानामुळे आमूलाग्र फरक झाला आहे. तरी त्यामुळे ब्रिटिश व भारतीय हे दोन समाज एकजीव झाले आहेत, असें क्षणभर तरी म्हणतां येईल काय ?
 सर सय्यद यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्यापासून मुस्लिमांना परावृत्त करण्याचे प्रयत्न केले, तरी प्रारंभी ते तितके यशस्वी झाले नाहीत. बद्रुद्दीन तय्यबजीं- सारखे लोक पूर्ण काँग्रेसनिष्ठ होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे प्रारंभी काँग्रेसमध्ये हिंदु आठशे-हजार असले, तर मुस्लिम तीनशेपर्यंत तरी असतच. पण हळूहळू ही संख्या कमी होत गेली व १९०५ सालीं सातशेत्र्याहत्तर सभासदांपैकी केवळ सतरा