पान:इहवादी शासन.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८ । इहवादी शासन
 

प्रार्थनेंत खलिफाच्या नांवाने खुतवा वाचूं लागले. सर्व मुस्लिमांचा खलिफा हा शास्ता होय, हाच याचा अर्थ आहे.
 इक्बाल हे प्रसिद्ध मुस्लिम कवि प्रथम राष्ट्रवादी होते. पण पुढे ते विश्व- मुस्लिमवादी झाले व राष्ट्रवादाचा निषेध करूं लागले. राष्ट्रनिष्ठा हें पाप होय असें मौ. मोदुदी आजहि सांगत आहेत रेडियन्स, दावत आदि मुस्लिम पत्रे, वर्ल्ड मुस्लिम कॉन्फरन्स, वर्ल्ड मुस्लिम लीग या विश्व-मुस्लिमवादी संस्थांची महती गाऊन आजहि त्यांच्या तत्त्वज्ञानाला पाठिंबा देतात. तेव्हा हें स्पष्ट आहे की, प्रारंभापासून आतापर्यंत साडेसातशे वर्षे भारतांत राहूनहि भारतीय समाजाचे आपण एक घटक आहोत, असें मानण्यास मुस्लिम तयार नाहीत. जदुनाथ सरकारांनी म्हटल्याप्रमाणे ते येथे राहतात पण येथले होत नाहीत.

असहिष्णु वृत्ति

 भारतीय जीवनाशी समरस व्हावयाचें नाही एवढ्यावरच मुस्लिमांची विभक्त वृत्ति संतुष्ट राहिली नाही. या विभक्त वृत्तीचा दुसरा भाग म्हणजे हिंदूंशी हाडवैर धरावयाचें, त्यांना हीन, तुच्छ लेखावयाचें, त्यांना जीवन असह्य करून टाकावयाचे हा होता. मुस्लिमांत ही वृत्ति पोसण्याच्या कामांत सूफी पंथीय मौलवी हे अग्रेसर होते. अझीझ अहंमद म्हणतात, "मोइनुद्दीन चिस्ती या सूफी संताने भारतांत हिंदूंविरुद्ध आघाडी उभारून धर्मांतराच्या कार्याला चालना दिली." (पृष्ठ १३४).
 सय्यद नुरुद्दीन गझनवी हा सूफी संत अल्तमशकडे शिष्टमंडळ घेऊन गेला व त्याने त्याला सांगितलें की, "हिंदूंना इस्लाम स्वीकार किंवा मृत्युदंड याशिवाय तिसरा पर्याय ठेवू नये आणि हें जमत नसेल तर पावलोपावलीं त्यांचा अपमान करावा, पाणउतारा करावा व त्यांना बदनाम करावें. कारण हिंदु हे पैगंबराचे व इस्लामचे कट्टे शत्रु आहेत." वराणी हा मुस्लिम इतिहासकार मोठ्या दुःखाने म्हणतो की, "आज महंमद गझनी नाही हें दुर्दैव होय. तो असता तर त्याने मुस्लिम होण्यास नकार देणाऱ्या सर्व हिंदूंची कत्तल केली असती."
 फिरोझ तलख याने आपल्या चरित्रांत, आपण हिंदूंवर जिझिया कर कसा लादला, त्यांचा ठायीं ठायीं अपमान कसा केला, या भोगांना कंटाळून अनेक हिंदु मुस्लिम कसे झाले, हिंदूंची अनेक देवळें आपण जमीनदोस्त कशीं केलीं हें सर्व भूषण म्हणून आत्मचरित्रांत सांगितले आहे. लोदी, खिलजी या सुलतानांची हीच वृत्ति होती. अकबराच्या काळी, त्याच्या उदारमतवादी वृत्तीमुळे या मुसलमानी अत्त्याचारांना जरा खंड पडला होता. पण त्याच्या मागून वेताळ पुन्हा पूर्वस्थळावर आला. सूफी पंथांतील नक्षबंदी शाखेचा प्रसिद्ध मौलवी शेख अहंमद सरहिंदी हा या पक्षाचा प्रभावी नेता होय. "हिंदूंशी संपर्क ठेवणें हा इस्लामचा अपमान होय. हिंदु धर्म