पान:इहवादी शासन.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दहा । इहवादी शासन
 

मंडळ, या सर्वांनी मला आपली ग्रंथालयें मुक्तद्वार ठेवली होती. त्यांच्या सहकार्यावांचून ग्रंथलेखन असें वेगाने झालें नसतें.
 राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, समाजवाद, या विषयावरच्या माझ्या लेखनाचें जनतेने आजपर्यंत चांगलें स्वागत केलें आहे. माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांतील विचार लोकांत प्रसृत करण्यासाठी माझ्या लेखांचें सामुदायिक वाचन केलें व त्यांच्या आधारे व्याख्यानेंहि दिली. इहवादी तत्त्वांचे लोकमानसावर संस्कार करण्यासाठी सुद्धा ते असाच उद्योग करतील असा विश्वास व्यक्त करून ही प्रस्तावना संपवितों.

१० जानेवारी १९७२ ]
- पु. ग. सहस्रबुद्धे