पान:इहवादी शासन.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४ । इहवादी शासन
 

होता. त्यामुळे तें पीठ खवळून उठले व त्याने जॉन हसला आपल्यापुढे उपस्थित राहण्याचें फर्मान सोडलें. जॉन हस एरवी तेथे गेला नसता. पण हंगेरीचा राजा सिसिग्मंड याने त्याला अभय दिले म्हणून तो गेला. पण राजाने त्याला दगा दिला व कन्स्टन्स येथील धर्मपरिषदेने त्याला जाळून मारण्याची शिक्षा दिली.

विवेकाची साक्ष

 तेव्हाचें जॉन हसचें भाषण म्हणजे दीड हजार वर्षांपूर्वी सॉक्रेटिसने केलेल्या भाषणाचे प्रतिध्वनीच होते. तो म्हणाला, "मी परमेश्वर व माझी विवेकदेवता यांनाच फक्त प्रमाण मानतो. तुम्ही म्हणतां शेकडो धर्माचार्यांचें मत माझ्या मताच्या विरुद्ध आहे. असेल, लाखांचें असेल ! माझ्या विवेकाची साक्ष मी त्याहून मोठी मानतो. मी लोकांना उपदेश केला त्यापेक्षा जास्त पवित्र, जास्त उदात्त, असं जगांत काय आहे ? तुम्ही कर्मकांडाला धर्म मानतां मी आत्म्याच्या विकासाला धर्म मानतों. परमेश्वराने हाच धर्म सांगितला आहे."
 परिषदेने, सरदारांनी, राजाने जॉन हसचें मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. 'मी चुकलों' असें फक्त लिहून दे, तुला मोठे धर्माधिकार देऊ, अलोट धन देऊं, मोक्ष देऊ, अशीं त्याला आश्वासने देण्यांत आली. पण त्याने सत्यनिष्ठा सोडली नाही व धैर्याने अग्निकुंडांत प्रवेश केला!
 पण जॉन हसला रोम-पीठाने दिलेली शिक्षा त्या पीठाच्या अंगावर उतून निघाली. बोहेमियन लोकांना हा भयंकर राष्ट्रीय अपमान वाटला. झिस्का या त्यांच्या सेनापतीने उत्कृष्ट लष्करी संघटना उभारली व पोपच्या पक्षाचें समर्थन करणाऱ्या जर्मन- रोमन सम्राटावर हल्ला चढविला. पुढील बारा वर्षांत बोहेमियन हसाईट (हसचे अनुयायी) व रोमन सम्राट् यांच्यांत पांच धर्मयुद्धे झाली. दर वेळी सम्राटाचा पराभव झाला; तेव्हा रोमचें पीठ घाबरून गेलं आणि त्याने बोहेमियनांपुढे शरणागति पत्करली. त्या वेळी हसाईटांनी पुढीलप्रमाणे तहाच्या अटी घातल्या- १. धर्मप्रवचनाचें प्रत्येकाला स्वातंत्र्य असावें. २. पोपची ऐहिक व्यवहारावरील सत्ता नष्ट व्हावी. ३. धर्मरूंनी प्राचीन ऋषींप्रमाणे वैराग्याने राहवें आणि ४. धर्मगुरूंच्या बाबतींत सरकारी न्यायालयांना न्याय करण्याचा अधिकार असावा. पोपला नाक मुठीत धरून या तहावर सही करावी लागली. या युद्धाच्या काळांत हसाईट लोकांनी हजारो पुस्तिका लिहून आपल्या म्हणजे जॉन् हसच्या तत्त्वज्ञानाचा सर्व युरोपभर प्रसार केला. पुढील शतकांत प्रोटेस्टंट पंथीय धर्मसुधारणेच्या चळवळींचा पाया अशा रीतीने या हसाईट युद्धांनी घालून ठेवला.

तत्त्ववेत्त्यांचें विचारधन

 मागल्या लेखाच्या अखेरीस पोपच्या धार्मिक सत्तेचें तत्त्वज्ञान आपण पाहिलें होतें, त्याचप्रमाणे आता या लेखाच्या शेवटीं इहवादाचें तत्त्वज्ञान प्रतिपादणाऱ्या