पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
इस्लाम आणि संस्कृति

 त्या काळी मालकाने उंटावरून अथवा घोड्यावरून बसून जावयाचे व गुलामाने बरोबर अनवाणी पळत राहावयाचे असा रिवाजच होता. इस्लामने हा रिवाज त्याज्य ठरविला आहे. गुलामाला आपला कुटंबीय मानल्यानंतर त्याच्याशी अमानुष वर्तन के हाहा निषिद्धच ठरते. प्रवास करीत असतां त्याला आपला भाऊ समजून उंटावर आपल्या बरोबर बसवून घेतले पाहिजे. हजरत पैगंबराच्या आज्ञेचा एवढा विलक्षण परिणाम झाला की एकाच उंटावर बसून मालक व गुलाम प्रवास करूं लागले; इतकेच नव्हे तर मोठी मझल करावयाची असेल तर काही वेळ गलाम उंटावर बसून मालक पाया चाले व कांहीं वेळ मालक उंटावर बसून गुलाम पायी प्रवास करा. खलिफा हजरत उमर यांचे उदाहरण आपण मागे पाहिलेच आहे.
 " त्याला माझा गुलाम किंवा दासी न म्हणतां माझा मुलगा किंवा कन्या म्हणून संबोधा."

-हजरत मुहम्मद पैगंवर

 गुलामाला दास्यत्व किंवा गुलामगिरीची आठवण चुकून दखार होणार नाही अशी आपण खबरदारी घेतली पाहिजे. अमूक एक आपला नोकर आहे असे आपण चारचौघांसमक्ष बिनदिक्कत सागता पण इस्लामने अशा गोष्टीस सक्त मनाई केली आहे. आपण आपल्या नोकरांना किंवा गुलामांना त्यांच्या दास्यत्वाची जाणीव करून द लागलों तर त्यांच्या भावना दुखावल्या जाण्याचा संभव असतो किना त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची कल्पना कायमची ठाण मांडून बसत. मालक आणि नोकर किंवा गुलाम यांमधील भेदभाव नष्ट होण्याऐवजी तो वाढीसच लागतो. या सर्व गोष्टी टाळण्याकरितां नोकराना व गुलामांना आपण स्वतःच्या मुलांप्रमाणे वागविले पाहिजे. आपण