पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

८९


आपल्यासारख्याच सुखदुःखाच्या संवेदना आहेत, त्यांच्याशी प्रेमानें वागले पाहिजे, त्यांना आपल्या कुटुंबियांशी समरस करून घेतले पाहिजे, त्यांना आपल्यासारखें स्वातंत्र्य मिळवून देणे हे पुण्य कार्य आहे अशी विचारप्रणाली क्रमाक्रमाने मांडून, इस्लामने गुलामगिरीस प्रोत्साहन देणाऱ्या किंवा ती आवश्यक आहे अशी मानणान्या मनोवृत्तीचा नि:पात केला आहे असें हदीस व पवित्र कुराणवरून आपणांस आढळून येईल.
 " तुम्ही खातां ते अन्न आणि वापरतां ती वस्त्रप्रावरणे त्यांना द्या."

-हजरत मुहम्मद पैगंबर.


 गुलामांबद्दल वाटणारी तुच्छतां आपण काढून टाकिली पाहिजे. त्याला परका किंवा हीन न समजतां तो आपल्या कुटुंबियांपैकीच आहे असे आपण समजले पाहिजे. कुटुंबियांमध्ये खाणेपिणे किंवा कपडेलत्ते यांच्या बाबतीत कधीच भेदभाव दिसन येत नाही. सर्वांना सारखेच अन्न व कपडेलत्ते दिले जातात. अशीच आत्मीयता आपण गलामांना दाखविली पाहिजे. त्यांच्या तोंडावर चार शिळे तुकडे टाकून न देतां, आपण जे अन्न खातों तें अन्न आणि त्यांच्या अंगावर फाटकी लतकरें असतील तर त्याऐवजी आपण पेहेरतो तसे कपडे त्यांना पुरविले पाहिजेत.

 "(तुम्ही ज्या वाहनावर बसाल) त्या वाहनावर त्यांना बसवा; कारण तो तुमचा भाऊ आहे आणि तुमच्यासारखा त्यांनाही आत्मा आहे.”

-हजरत मुहम्मद पैगंबर