पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

९१


आपल्या मुलांना जितकें प्रेमाने वागवितों तितक्याच प्रेमानें गुलामांनाही वागविले पाहिजे. हजरत पैगंबरांना गुलामाबद्दल इतकी सहानुभूति व जिव्हाळा होता की, ते मत्युशय्येवर पडले असतां अली इब्न अबू तालीब यांना म्हणाले, “प्रार्थना करीत रहा आणि गुलामांची काळजी घेऊन त्यांना दयाळूपणाने वागवा हेच माझें शेवटचे सांगणे आहे."
 एक दिवस हजरत पैगंबरांना एक सद्गृहस्थ म्हणाला की, गुलामांनी चूक केली नाही तर त्यांना दयाळूपणाने वागवाव पास हरकत नाही; पण त्यांनी प्रमाद केले तर मात्र त्यांना शिक्षा करावयाचा अधिकार असला पाहिजे. हजरत पैगंबरांनी त्या सद्गृहस्थास सांगितले, “ गुलामाने एकादीच चूक काय पण प्रतिदिनी सत्तर चुका केल्या तरी आपण त्या क्षम्य मानल्या पाहिजेत." मनुष्य स्खलनशील आहे. त्याच्या हातून चुका होणे साहजिक आहे. त्या चुका लक्षात न घेतां त्याला क्षमा करणे म्हणजे पुन्हां त्या चुका न होतील अशी खबरदारी घेणे होय. क्षमा ही कधीही फुकट जात नाही. ज्या गोष्टी ची आपण अपेक्षा करतो ती गोष्ट सत्यसृष्टीत उतरविण्याचे श्रेष्ठ कार्य ती करूं शकते.
 " गुलामांना वाईट रीतीने वागविणारास स्वर्गाचे द्वार बंद असते.”

-हजरत मुहम्मद पैगंबर


 हा दंडक घालून हजरत पैगंबरांनी गुलामांवर होणाऱ्या अत्याचारांना कायमची मूठमाती दिली. हजरत पैगंबरांची आज्ञा ही धर्माज्ञा समजून गुलामांना अत्यंत दयाळपणाने वागविण्यांत येऊ